

Congress Vs BJP : पश्चिम बंगालमध्ये विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी हे दोन मतदारसंघातून विजयी झाले होते. त्यांनी नंदीग्राम येथून राजीनामा दिला होता. तेथे पोटनिवडणूक होत आहे. दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी उभ्या केलेल्या संचिता प्रधान यांनी ऐनवेळी माघार घेत भाजप उमेदवाराला पाठींबा दिला.
ममता बॅनर्जी यांनी तत्काळ काँग्रेस उमेदवार मिलन प्रधान यांना आपला पाठींबा जाहीर केला. दरम्यान, पाठींबा जाहीर केल्यानंतर अवघ्या काही वेळात मिलन प्रधान यांना पोलिसांनी अटक केली. दरम्यान, या अटकेनंतर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी भाजप घाबरली आहे. त्यामुळे त्यांनी असे केले आहे, अशी टीका केली आहे.
राहुल गांधी यांनी प्रधान यांना अटक केल्यानंतर भाजपवर टीका केली आहे. ते म्हणाले, नंदीग्राम पोटनिवडणुकीत काँग्रेस उमदेवार मिलन प्रधान यांना झालेली अटक हा योगायोग नाही, राजकीय बदला आहे. ही लोकशाहीची हत्या आहे.
भाजपचा निष्पक्ष निवडणुकीवर विश्वास नाही. म्हणून ते कधी व्होट चोरी, सरकार चोरी आणि कधीकधी पक्ष चोरी करून आपली सत्ता वाचवतात. मात्र, काँग्रेस घाबरणार नाही, झुकणार नाही. आम्ही लढू आणि जिंकू, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
दहा वर्षांपूर्वीच्या एका हत्या प्रकरणात ही अटक करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, निष्पक्ष निवडणूका पार पडू न देता भाजपने ही खेळी खेळल्याची चर्चा आहे. मिलन प्रधान यांच्यासोबत पक्षाचे सरचिटणीस सुभाषिस भट्टाचार्य यांना देखील अटक झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.