शिवसेना कदापी माफी मागणार नाही : चतुर्वेदींचा आक्रमक पवित्रा

१२ खासदारांच्या निलंबनावरुन गोंधळ...
Priyanka chaturvedi
Priyanka chaturvedi Sarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : सरकारने राज्यसभेतील १२ खासदारांच्या (12 MP Suspended) केलेल्या निलंबनावरुन सुरु झालेला गोंधळ शांत होताना दिसत नाही. आज विरोधी पक्षांनी बैठकांचा धडाका लावला आहे. सोबतच निलंबित खासदार काँग्रेसचे (Congress) खासदार राहूल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वात उपसभापतींच्या भेटीला गेले आहेत. तिकडे सरकारकडून माफी मागितली तर निलंबन मागे घेवू असा प्रस्ताव येत असल्याचे सांगितले जात आहे. पण शिवसेनेचे खासदार कदापि माफी मागणार नाहीत, असा ठाम पवित्रा शिवसेनेच्या निलंबित खासदार प्रियांका चतुर्वेदी (Shivsena MP Priyanka Chaturvedi) यांनी घेतला.

विधेयके रेटण्यासाठी आणि विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी सरकारने ही निलंबनाची कारवाई केली असल्याची टीका प्रियांका चतुर्वेदी यांनी केली. सोबतच सरकारचे हे कोणत्या प्रकारचे असंसदीय वर्तन सुरू आहे? असाही सवाल त्यांनी विचारला. जिल्हा न्यायालय ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत आरोपींना बाजू मांडण्याची संधी दिली जाते. त्यांना वकील दिले जातात तर कधी सरकारी अधिकारी त्यांची बाजू ऐकायला जातात. मात्र संसदेत आम्हाला आमची बाजू मांडण्याची संधी दिलीच नाही, असा देखील आरोप प्रियांका चतुर्वेदी यांनी केला.

Priyanka chaturvedi
'भास्कर जाधव' नावाचे अस्त्र विरोधकांना पुन्हा घायाळ करणार?

तसेच नियम २५६ नुसार ज्या अधिवेशनात गोंधळ झाला त्याच अधिवेशनात गोंधळी सदस्यांचे निलंबन करता येते. दुसऱ्या अधिवेशनात तशी कारवाई करता येत नाही व त्यामुळे ही कारवाई अत्यंत चुकीची आहे. दुसरीकडे आम्हाला अंधारात ठेवून ही कारवाई केली गेली ती बेकायदा आहे. याबाबत आपण सभापती वैकंय्या नायडू यांना भेटून दाद मागणार असल्याचे चतुर्वेदी म्हणाल्या.

Priyanka chaturvedi
"संसार मोडला, पण आमचे प्रेम कायम" गिरीश महाजनांची जाहीर कबुली

दूसऱ्या बाजूला माफी मागितली तर निलंबन मागे घेऊ अशा पद्धतीच्या सरकारी प्रस्तावाच्या चर्चा आहेत. यावर त्या म्हणाल्या शिवसेनेचे खासदार कदापि माफी मागणार नाहीत. माफी कोणत्या गोष्टींसाठी? शेतकऱ्यांसाठी, लोकशाही मूल्यांसाठी लढतोय, त्यासाठी? देशातील जनतेचा आवाज उठवतोय? लाखो विमा कर्मचाऱ्यांचा आवाज बनतोय, मग माफी कसली? खासदार माफी मागणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com