मोठी बातमी : अखेर माणिकराव कोकाटेंना हटवलं; दत्तामामा भरणे नवे कृषी मंत्री

Manikrao Kokate News : कृषी मंत्रिपदावरून वादग्रस्त माणिकराव कोकाटे यांना हटविण्यात आले आहे. मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे कृषी खाते सोपविण्यात आले आहेत
Dattatray Bharne replaces Manikrao Kokate as Agriculture Minister
Dattatray Bharne replaces Manikrao Kokate as Agriculture MinisterSarkarnama
Published on
Updated on

Manikrao Kokate News : अखेर कृषी मंत्रिपदावरून वादग्रस्त माणिकराव कोकाटे यांची उचलबांगडी झाली आहे. मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे कृषी खाते सोपविण्यात आले आहेत. तर भरणे यांच्याकडील क्रीडा आणि अल्पसंख्यांख खाते कोकाटे यांना दिले आहे. गुरुवारी (३१ जुलै) रात्री उशीरा कोकाटे यांच्या डिमोशनवर शिक्कामोर्तब झाले. सातत्याने शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त विधाने करणे आणि विधानसभेत रमी खेळणे कोकाटे यांना भोवल्याचे दिसून येते.

सातत्याने शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त विधाने केल्याने मंत्री कोकाटे टीकेचे धनी ठरले होते. अशातच पावसाळी अधिवेशनात विधानभवनात रमी खेळतानाचा व्हिडिओ वायरल झाल्यानंतर कोकाटे यांच्याकडील कृषी खात्याचा कारभार काढून यावा अशी मागणी करण्यात येत होती. त्यानुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासोबत कृषिमंत्री कोकाटे यांच्याबाबत चर्चा केली.

या चर्चेतील निष्कर्षानुसार कोकाटे यांचे मंत्रिपद वाचले आहे. मात्र, त्यांना कृषिमंत्री पद सोडावे लागले आहे. कोकाटे यांच्याकडील कृषिमंत्रीपद राज्याचे युवक कल्याण व क्रीडामंत्री दत्तात्रेय भरणे यांच्याकडे गेले आहे. तर दत्तात्रेय भरणे यांच्याकडील क्रीडा व युवक कल्याण विभागाचे मंत्रिपद माणिकराव कोकाटे यांच्याकडे आले आहे. एकप्रकारे कोकाटे यांचे डिमोशनच झाले आहे.

आज सकाळपासूनच मुख्यमंत्र्यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत बैठका सुरू होत्या. त्यात कोकाटे यांच्याकडील संवदेनशील असलेल्या कृषी मंत्रालयाचा पदभाार काढून घेण्यावर एकमत झाले. कृषिमंत्रीपद हे संवेदनशील मानले जाते. त्यामुळे कमी बोलणारा मंत्री या खात्याला आवश्यक होता. अगोदर शेतकरी कर्जमाफी, शेतीमालाचे पडलेले बाजारभाव यामुळे शेतकरी वर्गाची नाराजी सरकारवर आहे. त्यातच कोकाटेंच्या विधानांनी त्यात पुन्हा भर टाकली, त्यामुळे राष्ट्रवादीचे नेतृत्व कोकाटेंवर नाराज होते.

दोन दिवसांपूर्वी झालेल्या भेटीत अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांना खडेबोल सुनावले होते. आतापर्यंत खूप चुका झाल्या. तुम्हाला खूप सांभाळून घेतले. पण यापुढे माफी नाही, असेही त्यांनी खडसावले होते. त्यामुळे कोकाटे यांचे मंत्रिपद जाण्याची चर्चा होती. मात्र, कोकाटेंचे मंत्रिपद वाचले असून त्यांच्या खात्यात मात्र बदल झाला आहे. माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषिमंत्रिपदाचा पदभार राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्याकडे जाण्याची चर्चा दोन दिवसांपासून होती. मात्र, मकरंद पाटील यांचे नाव मागे पडून आता क्रीडामंत्री भरणे यांचे नाव कृषिमंत्रीपदासाठी पुढे आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com