Manikrao Kokate : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे राजीनामा देणार; रोहित पवारांचा मोठा दावा, अजितदादांसारखी कठोरता शिंदेसाहेब दाखवतील का?

Rohit Pawar's Big Claim : विधानसभेचे कामकाज सुरू असताना कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे ऑनलाईन रमी खेळत असल्याचा व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी ट्विट केला होता. त्यानंतर राजकारणात एकच खळबळ उडाली होती.
Manikrao Kokate
Manikrao KokateSarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 25 July : महाराष्ट्राचं राजकारण सध्या आरोप-प्रत्यारोपांनी मोठ्या प्रमाणात गाजत आहे. विविध मंत्र्यांवर आरोप झाले असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. पावसाळी अधिवेशन सुरू असताना कृषिमंत्री माणिकराव कोकटे हे विधानसभेतच ऑनलाईन रमी खेळ असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्यावरून राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. त्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी कोकाटेंच्या राजीनाम्याबाबत मोठे भाष्य केले आहे. त्यासोबत बॅगवाल्या मंत्र्याच्या राजीनाम्याचीही महाराष्ट्र वाट पाहतोय, असे त्यांनी म्हटले आहे.

विधानसभेचे कामकाज सुरू असताना कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) हे ऑनलाईन रमी खेळत असल्याचा व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी ट्विट केला होता. त्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. एकीकडे शेतकरी आत्महत्या करत असताना कोकाटे हे विधानसभेत रमी खेळत असल्याने त्यांच्यावर चोहोबाजूंनी टीका हेात आहे. त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.

त्यातच राष्ट्रवादीचे (NCP) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या लातूर दौऱ्यावेळी त्यांच्या समोर पत्ते फेकल्याने चिडलेल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण केली. त्यानंतर चव्हाण यांचा तातडीने राजीनामा घेण्यात आला. मात्र, कोकाटे यांचे काय प्रश्न उपस्थित होत आहे.

कृषिमंत्री कोकाटे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण मोबाईलमध्ये आलेली ऑनलाईन रमीचा गेम स्कीप करत होता, असे स्पष्टीकरण दिले. तसेच, रोहित पवार यांच्यावर जोरदार टीकास्त्रही सोडले. त्यामुळे या दोनही घटनांमुळे कोकाटेंवरील राग वाढतच गेला. त्यातच छावा संघटनेने संपूर्ण राज्यभरात आंदोलन केले. त्यामुळे कोकटेंवर राजीनाम्यासाठी दबाव वाढत आहे.

Manikrao Kokate
Shashikant Shinde : पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंच्या घराची पोलीस कर्मचाऱ्याकडून रेकी; कार्यकर्ते आक्रमक

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासदंर्भातील निर्णय चर्चेनंतर होईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही गुरुवारी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. त्यामुळे कोकाटेंच्या मंत्रिपदाचा सस्पनेस वाढला आहे. त्याच आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी कोकाटे यांच्या मंत्रिमंडळातील स्थानाविषयी मोठे भाष्य केले आहे.

Manikrao Kokate
Manikrao Kokate : कोकाटे मुक्कामी थांबलेल्या हॉटेलबाहेर ठाकरे-पवारांच्या कार्यकर्त्यांचा गराडा.. पत्ते अन् काळे झेंडे..

आमदार रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, पत्ते खेळणाऱ्या कृषीमंत्र्यांचा राजीनामा होण्याची शक्यता असून उपमुख्यमंत्री अजितदादा दाखवत असलेली ही कठोरता सरकारमधील इतर मित्रपक्ष दाखवतील का? बॅगवाल्या मंत्र्याच्या राजीनाम्याचीही महाराष्ट्र वाट पाहतोय, त्यांच्यावर देखील नेतृत्वाला कारवाई करावीच लागेल. बॅगवाल्या मंत्र्यांवर कारवाई करायची हिंमत एकनाथ शिंदे साहेब कधी दाखवणार? असा सवालही त्यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com