

Mumbai News : कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्यावरुन मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. अंतरवाली सराटीत गुरुवारी त्यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारकडून कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्यावर हस्तक्षेप केला जात असल्याचे सांगत आरोपांची राळ उडवून दिली. पत्रकार परिषदेत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका केली. त्या टीकेनंतर सीएम फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली.
प्रसार माध्यमाशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'ते नेमकं काय बोलले ते ऐकले नाही. प्रमाणपत्र जेव्हा जात पडताळणी समितीकडे जाते, तेव्हा समिती सर्वोच्च न्यायालयाच्या अंतर्गत काम करत आहेत. राज्य सरकारचा हस्तक्षेप नाही. कोर्टाच्या आदेशाने करत आहेत. किती प्रमाणपत्र रद्द केले याची कल्पना नाही. पण मोठ्या प्रमाणात वेगवेगळे प्रमाणपत्र येतात त्यात १० ते १२ टक्के रद्द होतात. नॉन कुणबीही रद्द होतात. कागदपत्राची पूर्तता न झाल्याने रद्द होतात.”
मंत्री बावनकुळे यांच्या आदेशानंतर कुणबी प्रमाणपत्र रद्द झाल्याचा आरोपही यावेळी जरांगे यांनी केला होता. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले, “जाणीवपूर्वक कोणी करत नाही. पण कुणाचा यात काही आक्षेप असेल तर त्यात बघण्यात येईल. वरिष्ठ अधिकारी त्यात बघतील. योग्य प्रक्रिया झाली की नाही ते बघतील. यात अपील करता येईल.'
आम्ही सत्तेत आहोत, पण भाजपच्या अनेक नगरसेवक आणि जिल्हा परिषद समिती सदस्यांचे प्रमाणपत्र रद्द झाले आहेत. यात सरकारचा हस्तक्षेप नाही. कोर्टाच्या आदेशानेच ते काम करत आहेत. कुठलेही मंत्री असे करणार नाहीत. मी पुन्हा सांगतो, त्यात काही असेल अन्याय झाला वाटत असेल तर अपील करता येईल. ज्या त्रुटी समितीने काढल्या त्याची पूर्तता करता येतील.” अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.