Manoj Jarange Mumbai March : मनोज जरांगेंची मुंबईत जाण्याची घोषणा, कोर्टाच्या निर्णयाचा बसणार फटका?

Manoj Jarange Protest Mumbai High Court Decision: मनोज जरांगे पाटलांनी मराठा आंदोलकांना चलो मुंबईची हाक दिली आहे. मात्र, मागील वेळी कोर्टाने घेतलेल्या निर्णयाचा फटका जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला बसण्याची शक्यता आहे.
Manoj Jarange | Mumbai High Court  Decision
Manoj Jarange Mumbai High Court DecisionSarkarnama
Published on
Updated on

Manoj Jarange Mumbai Protest News : मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. उद्या (शनिवारी) त्यांनी यासंदर्भात आंतरवाली सराटीमध्ये बैठक देखील बोलावली आहे. जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे. मात्र, सरकार त्याला अपेक्षित प्रतिसाद देत नसल्याने हे आंदोलन अधिक आक्रमक करण्यासाठी त्यांनी चलो मुंबईचा नारा दिला आहे.

जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलनाची घोषणा केली असली तरी कोर्टाचा निर्णयामुळे त्यांची कोंडी होणार आहे. जरांगे पाटील यांनी मागील वेळी आझाद मैदानावर आंदोलन केले होते. त्याची गंभीर दखल कोर्टाने घेतली होती. त्याचवेळी न्यायालयाने स्पष्ट केले होते की, आझाद मैदानावर आंदोलनसाठी केवळ पाच हजार आंदोलकांना परवानगी असेल. आंदोलकांना आझाद मैदान सोडून इतरत्र आंदोलन करता येणार नाही. त्यांच्या आंदोलनामुळे वाहतूक आणि इतर नागरी समस्या निर्माण झाल्या नाही पाहिजेत.

या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील हे पुन्हा मुंबईत आले तर ते आंदोलनासाठी आझाद मैदानावर येण्याची शक्यता आहे. मराठा आंदोलकांनी यापूर्वीच आझाद मैदानाची पाहणी केली होती. त्यामुळे ते पुन्हा आझाद मैदानाच आंदोलन करणार अशी शक्यता होती. दरम्यान, राज्य सरकारकडून जरांगे पाटील यांना मुंबईच्या ऐवजी नवी मुंबईतील मोकळ्या मैदानात आंदोलनासाठी परवानगी देत त्यांना मुंबई येण्यापासून रोखले जाऊ शकते.

Manoj Jarange | Mumbai High Court  Decision
Mumbai Protest Rules : आंदोलनाला 3 दिवस उरलेले असतानाच जरांगेंना धक्का? मैदानाबाबत गृह विभागाने घेतला मोठा निर्णय

सरकारने नियम बदलला

मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या आधीच दक्षिण मुंबईमध्ये आंदोलन करता येणार नसल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले होते. फक्त आझाद मैदानावर आंदोलन करता येईल. शिवाय आंदोलनासाठी आठवडाभर आधी परवानगी घ्यावी लागेल. आंदोलन सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेतच करता येईल, त्यानंतर आंदोलनकर्त्यांना आझाद मैदान खाली करावे लागेल.दक्षिण मुंबईत कुठेही आंदोलन मोर्चे, धरणे करण्यास मनाई करण्यात आली आहे. शिवाय आझाद मैदानासाठी आधी अर्ज केलेल्यांना आधी परवानगी मिळणार आहे

Manoj Jarange | Mumbai High Court  Decision
Mumbai Protest Guidelines: मुंबई गाठण्याआधीच सरकारची नियमावली; संतापलेले जरांगे म्हणाले, 'आम्ही तुमची रेल्वे फिरू देणार नाही, विमानं उडू देणार नाही...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com