PCMC NEWS: आमचं नगरसेवक पद घालवतो का? थांब गोळ्याच घालतो...पिंपरी चिंचवडमध्ये ओबीसी कार्यकर्त्याला धमकी

PCMC corporators caste certificate: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील 20 नगरसेवकांच्या जात प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. ओबीसी कार्यकर्ते मंगेश ससाणे आणि मृणाल ढोले-पाटील यांनी धमकी मिळाल्याचा दावा केला आहे.
PCMC
PCMCSarkarnama
Published on
Updated on

Pune News: नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील काही उमेदवारांनी ओबीसी आरक्षित जागांवर निवडणूक लढवून विजय मिळवला. मात्र, हे बहुतांश उमेदवार मराठा समाजातील असून, त्यांनी 'कुणबी' ओबीसी असल्याचा खोटा दावा करून निवडणूक जिंकल्याचा गंभीर आरोप ओबीसी कार्यकर्ते मंगेश ससाणे आणि मृणाल ढोले-पाटील यांनी केला आहे.

याप्रकरणी त्यांनी जिल्हा जात पडताळणी समिती, पुणे यांच्याकडे रीतसर तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर रवी लांडगे यांच्यासह २० नगरसेवकांच्या जात प्रमाणपत्रांची पडताळणी आणि सुनावणी सध्या सुरू आहे.

आरक्षित जागेवरून निवडून आल्यानंतर सहा महिन्यांच्या आत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असते. तसे न झाल्यास संबंधित लोकप्रतिनिधीचे पद रद्द होऊ शकते. या कायदेशीर प्रक्रियेमुळे आता 'त्या' २० नगरसेवकांचे पद धोक्यात आले असून, ते रद्द होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

रात्री २ वाजता आला धमकीचा फोन

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, तक्रारदार आणि ओबीसी आंदोलक मंगेश ससाणे यांना जीवे मारण्याची धमकी आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी त्यांनी अज्ञात व्यक्तीविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

मंगेश ससाणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, "पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील नगरसेवकांच्या कुणबी दाखल्यांना आव्हान दिल्याने, एका अज्ञात व्यक्तीने रात्री २ वाजता फोन करून थेट गोळ्या घालून मारण्याची धमकी दिली."

धमकी देणाऱ्या व्यक्तीने "आमचं नगरसेवक पद घालवतो का?" "केस मागे घे, नाहीतर गोळ्या घालतो!""मागच्या वेळेस तू वाचला आहेस, आता सोडणार नाही." अशी धमकी दिली असल्यास सांगितल आहे. यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com