Jarange Vs Munde Video : 'धनंजय मुंडेंनी अजितदादांचे पाय धरले, घातपात चौकशीसाठी...', मनोज जरांगे पाटील आक्रमक, 'त्या' प्रकरणात माघार नाहीच

Dhananjay Munde Ajit Pawar : धनंजय मुडेंनी तिघांना अडीच कोटी देऊन आपल्याला मारण्यासाठी सुपारी दिल्याचा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला होता. आता मुंडेंची चौकशी झाली पाहिजे या मागणीसाठी जरांगे आक्रमक झाले आहेत.
Manoj Jarange Patil-Devendra Fadnavis-Dhananjay Munde-Ajit Pawar
Manoj Jarange Patil-Devendra Fadnavis-Dhananjay Munde-Ajit PawarSarkarnama
Published on: 
Updated on: 

Manoj Jarange News : माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. आपल्या घातपाता मागे धनंजय मुंडेच आहेत. जे तीन आरोपी पकडले त्यांनी कबुल केले आहे की मुंडेंनी त्यांना अडीच कोटी रुपये दिले. मग मुंडेंना चौकशीला का बोलवत नाहीत? असा सवाल जरांगे पाटील यांनी केला.

पुढे बोलताना ते म्हणाले की, धनंजय मुंडेंना क्लिन चीट दिली जातीय. त्यांनी अजित पवारांचे पाय धरून माझी चौकशी टाळा अशी विनंती केली. दरम्यान, आपल्याला मारण्यासाठी मुंडेंनी मारकरे पाठवले होते या आरोपावरून जरांगे माघार घेण्यास तयार नसल्याचे दिसून आले.

धनंजय मुंडे यांना चौकशीसाठी बोलावले नाहीत तर त्याचे परिणाम गंभीर होतील, असा इशारा देखील जरांगे पाटील यांनी दिला आहे. नवी मुंबईत आयोजित कृतज्ञता सोहळ्यात ते बोलत होते.

मुंडे यांनी माणसं पाठवून आपल्याला मारण्याचा प्लॅन केला होता असा गौप्यस्फोट काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी केला होता. त्यांच्या या आरोपानंतर मुंडेंनी पत्रकार परिषदे घेत आपली चौकशी करा आपले नाव विनाकारण घेतले जात आहे, असे प्रतिआव्हान जरांगेंना दिले होते.

धनंजय मुंडेंनी माझी सीबीआय चौकशी करावी, मी नार्को टेस्ट देण्यास देखील तयार आहे. माझी ब्रेन मॅपिंग करा, असे म्हणत जरांगे पाटील यांची देखील नार्को टेस्ट करण्याचे आव्हान केले होते.

Manoj Jarange Patil-Devendra Fadnavis-Dhananjay Munde-Ajit Pawar
BJP Secret Files : भाजपच्या कारनाम्यांची 'सिक्रेट फाईल' उद्धव ठाकरेंच्या हाती; भ्रष्टाचार अन् पाच वर्षात..., वसंत मोरेंच्या दाव्याने खळबळ

मुंडे-जरांगे संघर्ष वाढणार

धनंज मुंढे विरुद्ध मनोज जरांगे पाटील यांच्यातील संघर्ष आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाढण्याची शक्यता आहे. बीडमध्य ओबीसींची सभा घेत आव्हान देणाऱ्या ओबीसी नेत्यांना निवडणुकीत पराभूत करा, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले होते.

Manoj Jarange Patil-Devendra Fadnavis-Dhananjay Munde-Ajit Pawar
Walmik Karad : बीडमध्ये धमक्या? 'अण्णा बाहेर येतोय'; स्ट्राँग रुमला पहारा देणारा शरद पवारांचा उमेदवारच रडारवर

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.