BJP Secret Files Allegation 2025 : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात घडामोडी घडताना पाहायला मिळत आहे. विविध पक्षांकडून निवडणुकीच्या दृष्टिकोनातून वेगवेगळी रणनीती आखण्यात येत आहे. अशीच काहीशी रणनीती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आखण्यात अली आहे. आणि या रणनीतीची फाईल पुण्यातील पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांना सुपूर्ती केली आहे.
दोन दिवसापूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये महायुतीतील काही स्थानिक नेत्यांचा पक्षप्रवेश घडून आणण्यात आला. त्यासोबतच मुंबईमध्ये आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून बैठक देखील संपन्न झाली. या बैठकीनंतर पुण्यातील शिवसेनेचे नेते वसंत मोरे आणि शहर प्रमुख गजानन थरकूडे आणि संजय मोरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एक फाईल सुपूर्द केली आहे.
या फाईल मध्ये ठाकरे सेनेच्या नेत्यांकडून मागील पाच वर्षांमध्ये भाजपाकडून करण्यात आलेल्या विकास कामांचा कच्चा चिठ्ठा मांडला असल्याचे सांगितले जात आहे. भाजपची एक हाती सत्ता असताना भाजपने कोणकोणते प्रकल्प राबवले आणि त्या प्रकल्पांमध्ये कशाप्रकारे भ्रष्टाचार झाला याची आकडेवारी या फाईल मध्ये मांडण्यात आली आहे.
भाजपने मागील निवडणुकी कोण कोणती आश्वासन आपल्या वचननाम्यातून दिली होत. आणि किती आश्वासन पूर्ण करण्यात आली याबाबतची आकडेमोड या फाईलच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्या पर्यंत पोहोचवण्यात आली आहे. भाजपने मागील पाच वर्षांमध्ये पुणेकरांची कशा पद्धतीने फसवणूक केली याबाबतचा संपूर्ण लेखाजोखा या फाईल मध्ये देण्यात आल्या असल्याचे वसंत मोरे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
या फाईल मध्ये भाजपच्या भ्रष्टाचाराची आणि आणि केलेला गलथान कारभाराची अनेक प्रकरण मांडण्यात आली असून या सर्व प्रकरणांचा भांडाफोड उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पुण्यामध्ये करण्याचे नियोजन ठाकरे सेनेकडून करण्यात आला आहे. यासाठी उद्धव ठाकरे हे पुणे दौऱ्यावर येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
पुण्यामधील भाजपच्या गलथान कारभारांचा कच्चाचिठा मांडत असतानाच मुंबईमध्ये शिवसेनेची सत्ता असताना कशाप्रकारे कारभार सुरू होता.कशाप्रकारे विकास काम पक्षाच्या माध्यमातून करण्यात आली याचा देखील लेखाजोखा असलेली फाईल उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून आणण्यात येणार असून ती पुणेकरांना दाखवण्यात येणार असल्याचं ठाकरे सेनेचे नेते वसंत मोरे यांनी सांगितला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.