Manoj Jarange Patil : आंदोलनाच्या एक दिवसआधीच मनोज जरांगेंच मोठं आवाहन, 'मराठा समाजाने...'

Manoj Jarange Patil Appeal to Maratha Community : मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटीमध्ये आंदोलनाची हाक दिली आहे. त्यापार्श्वभूमीवर आज त्यांनी मराठा समाजाला आवाहन केले.
Manoj Jarange Patil
Manoj JarangeSarkarnama
Published on
Updated on

Manoj Jarange Protest Latest News : मनोज जरांगे पाटील हे आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. ते उद्या शनिवार (ता.29) अंतरवाली सराटीत उपोषण करणार आहेत. उपोषणाच्या एक दिवस आधी त्यांनी मराठा समाजाला मोठं आवाहन केलं आहे.

जरांगे पाटील म्हणाले, 'एकदिवस देखील घरी थांबू नका, देवदर्शन करत बसू नका. ज्यांनी प्रमाणपत्रासाठी अर्ज केले आहेत त्यांनी सरळ आजच अंतरवाली सराटीमध्ये या. सरकार कस देत नाही तेबघू, त्यांच्या मुंडक्यावर पाय देऊन घेऊ.'

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेमध्ये स्पर्धा आहे. शिंदेंनी लाडकी बहीण आणली तर फडणवीसाने लाडकी दीदी आणली. मंत्र्यांनी फडणवीस, शिंदेंचे मराठ्यांच वाटोळं करू नये. खालच्या मंत्र्यांनी नीट राहावं, नाहीतर त्यांच्यावर वाईट वेळ येणार आहे, असा इशारा देखील जरांगे यांनी दिला.

'वर्षा'वर आंदोलन करणार...

मराठ्यांची मत घेऊन त्यांचीच जिरवत आहेत. आता मी त्यांची जिरवतो. आझाद मैदान, छत्रपती शिवाजी पार्क कुठच बसणार नाही. आता 'वर्षा'वर बसत असतो, असा इशारा देखील जरांगे यांनी दिला. फडणवीस, शिंदेंनी मराठा समाजाला दिले म्हणून तीन वर्ष शिंदेंना काही बोललो नाही. पण आता बावनकुळे, शिरसाटांना सांगून मराठ्यांच वाटोळं करताय ना, असे देखील ते म्हणाले.

Manoj Jarange Patil
Manoj Jarange Protest: मनोज जरांगेंचा पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा; मुख्यमंत्री फडणवीसांनी सरकारची बाजू मांडताना थेट मुद्द्यालाच हात घातला

...तर आंदोलन थांबवणार

मराठ्यांच्या पोरांनी, पोरींनी आत्महत्या करायच्या नाहीत. आत्महत्या केल्यातर मी आंदोलन थांबवत असतो. यांच्याकडून प्रमाणपत्र मी घेत असतो. ज्यांनी ज्यांनी कुणबीसाठी अर्ज केले होते. त्यांनी आंतरवालीत या, नोंद सापडली असून प्रमाणपत्र देत नाहीत ना तर अंतरावलीत या, तुम्ही अंतरवालीत येऊन बसा, येथून हालायच नाही, असे आवाहन देखील जरांगेंनी केले.

Manoj Jarange Patil
Maratha-Kunbi Certificates : मनोज जरांगेंच्या दाव्यातील सरकारने हवाच काढली; वैध मराठा-कुणबी प्रमाणपत्रांची आकडेवारीच दाखवली, मराठवाड्यातही तब्बल 20 हजार....

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com