
Mahayuti PC : भाजपच्या विधिमंडळ गटनेतेपदासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्यानंतर बुधवारी दुपारी महायुतीकडून राजभवनावर जाऊन सरकार सत्तास्थापनेचा दावा करण्यात आला. दरम्यान, याच वेळी राजभवनात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा करणारे पत्र काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राज्यपालांना पत्र देण्यात आले. त्यानंतर महायुतीच्या प्रमुख नेत्याची पत्रकार परिषद पार पडली. मी माझ्या वेगळ्या कामासाठी दिल्लीला गेलो होतो. मी कोणालाही भेटायला गेलेलो नव्हतो. माझ्या बाबतच्या अनेक बातम्या चालवल्या गेल्या. मी कोणाला भेटायला गेलेलो नव्हतो. त्यामुळे भेट नाकारण्याचा प्रश्नच येत नाही, असे म्हणत अजित पवारांनी दिल्ली वारीबाबत स्पष्टीकरण दिले. (Eknath Shinde PC News)
दोन दिवस मी दिल्लीला गेलो होतो. माझी पत्नी सुनेत्रा पवार या राज्यसभेच्या सदस्य आहेत. त्यांना 11 जनपथ येथे बंगला मिळालेला आहे. मला कोणत्याही गव्हर्मेंट घर असू द्या, आमचं स्वतःचं घर असू द्या, मला सगळं नीटनेटकं लागते. हे तुम्हा सर्वांना माहिती आहे, म्हणून मी तिथं आर्किटेकला घेऊन गेलो होतो. काही नियमांमध्ये गोष्टी बसवून करता येतात का ते ती गोष्ट पाहण्यासाठी गेलो होतो. त्याचवेळी प्रफुल पटेल आणि मला आमच्या केसेस चाललेल्या आहेत. त्या संदर्भात वकिलांना भेटण्यासाठी गेलो होतो. तिथली जबाबदारी नेहमी प्रफुल पटेल पाहतात. मात्र यावेळी मी गेलो होतो.
आमच्या चिन्हाच्या बाबतची सुरू असलेली सुनावणीची तारीख पुढे ढकलली आहे. तो पण एक विषय संपावा आमचा चिन्हाचा आणि नावाचा प्रश्न सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे. कोर्ट त्याबाबतीत योग्य तो निर्णय देईलच. मात्र, मागे इकडच्या कामामुळे मला कधी वकिलांना भेटता आलेले नव्हते, त्यांना भेटणं गरजेचं होते आणि एका जवळच्या व्यक्तीच्या नातेवाईकाचा लग्न होते, अशा तीन गोष्टी होत्या. त्याकरता मी दिल्लीला गेलो होतो. तिथे गेल्यानंतर थोडासा जास्त आराम मिळतो. त्यामुळे तिथं थोडंसं निवांत होतो. मुलं आणि पत्नी सुनेत्रा पवार देखील तिकडे होते, म्हणून मी गेलो होतो. अमित शाहांना किंवा कोणत्या दुसऱ्या नेत्याला भेटायला गेलो होतो हे डोक्यातून काढा असेही अजित पवार म्हणाले.
दरम्यान, पत्रकार परिषदेत बोलताना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्याबाबतचा निर्णय बुधवारी रात्रीपर्यंत घेतला जाईल असे सांगत उपमुख्यमंत्री पद स्वीकरण्याबाबतचा सस्पेन्स वाढवला. त्याच वेळी एकनाथ शिंदेंचे बोलणे मध्येच थांबवत शपथ 'मै तो लेनेवाला हू' असा डॉयलॉग केल्याने एकच हशा पिकाला. त्यांनी पण मी तर घेणार आहे, मी थांबणार नाही, असे अजितदादांनी (Ajit Pawar) म्हणतातच शिंदेंसह फडणवीस आणि इतर नेतेही खळखळून हसले
दादाच्या या मिश्किल टिपण्णीनंतर शिंदेंनीही सर्वांना थांबवत ते दादा आहेत, 'सुबह और श्याम ऐसा दिन मे दोबार ले सकते है' असे म्हणत पुन्हा एकदा सर्वांना खळखळून हसवले. त्यांनी दादांना तर सकाळी आणि संध्याकाळीही शपथ घेण्याचा अनुभव आहे, असे म्हणत मिश्किल टिप्पणी करीत टोला लगावला. या जुगलबंदीमुळे सर्वच नेत्यांची चांगलीच करमणूक झाली. एकंदरीत यावेळी दादा व एकनाथ शिंदे यांच्या एकमेकांवरील मिश्किल टिप्पणीमुळे पत्रकारपरिषदेतील वातावरण बदलून हास्यकल्लोळात बुडाले. या दोघामधील मिश्किल टीका टिपण्णीची चर्चा पत्रकार परिषदेनंतर काही वेळ राजभवन परिसरात चांगलीच रंगली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.