Manoj Jarange : वाल्मिक कराडला 302 का लावत नाही; जरांगेंचा सीएम फडणवीसांना सवाल

Santosh Deshmukh Murder Case : तोष देशमुखांच्या हत्येप्रकरणचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे वाल्मिक कराडवर मोक्का लावावा अशी मागणी केली जात आहे.
Devendra fadnavis & Manoj Jarange Patil
Devendra fadnavis & Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

Beed News : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन महिना उलटला आहे. त्यामुळे आक्रमक झालेल्या ग्रामस्थानी सोमवारी आंदोलन केले. यावेळी धनंजय देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे वाल्मिक कराडवर मोक्का लावावा अशी मागणी केली जात आहे.

मस्साजोगच्या ग्रामस्थांनी या मागणीसाठी आक्रमक पवित्रा घेतला. त्याचवेळी वाल्मिक कराडला 302 का लावत नाही असा सवाल करीत खंडणीचे आणि खुनाचे आरोप एकच आहे. जर त्यांच्यावर कारवाई नाही झाली तर राज्य एका खटक्यात बंद करेल, असा इशारा मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) दिला. मस्सजोग येथे येऊन पाण्याच्या टाकीवर चढलेलया धनंजय देशमुख यांना खाली उतरण्याची विनंती यावेळी मनोज जरांगे यांनी केली.

Devendra fadnavis & Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil : धनंजय देशमुख खाली या! ...; नाही तर, त्याच जगणं अवघड करेन; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा

तुम्हाला अजून मोबाईल सापडत नाही, त्यामध्ये खूप पुरावे असतील म्हणून तर तो मोबाईल फेकून दिला. वाल्मिक कराड खंडणीतला आरोपी आहे. त्याला 302 मध्ये आरोपी करू शकत नाही का, अशी टीका मनोज जरांगे यांनी केली. त्यासोबतच हा खटला फास्ट ट्रॅक मार्फत चालवावा, अशी मागणी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी केली आहे.

Devendra fadnavis & Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil : '...अन्यथा करेक्ट कार्यक्रम करू', मनोज जरांगे-पाटील यांचा सरकारसह धनंजय मुंडेंना इशारा

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शासन करा. ज्यावर खंडणीचा आरोपी आहे त्यांच्यावर मोक्का लावला. फडणवीस तुमचे सरकार खंडणीखोर चालवत आहे का? खंडणीचे आणि खुनाचे आरोप एकच आहे. जर त्यांच्यावर कारवाई नाही झाली तर राज्य एका खटक्यात बंद करेल, असे इशारा मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना इशारा यावेळी दिला.

Devendra fadnavis & Manoj Jarange Patil
Santosh Deshmukh Murder Case : पोलिसांचा टॉवरला बंदोबस्त; धनंजय देशमुखांचे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन

राज्य सरकारला उद्या सकाळी दहा वाजेपर्यंत अल्टिमेटम

धनंजय देशमुख यांनी आंदोलन मागे घेतले असले तरी मस्साजोगचे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. त्यांनी सरकारला उद्या सकाळी दहा वाजेपर्यंत अल्टिमेटम दिला आहे. यावेळेत मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा संपूर्ण गाव आंदोलन करणार, असा इशारा सरकारला देण्यात आला आहे.

Devendra fadnavis & Manoj Jarange Patil
Santosh Deshmukh Murder : संजय शिरसाटांचे मोठे विधान; ‘दोन दिवस वाट पाहा, वाल्मिक कराड किंवा आणखी कोणी...? तोही यातून वाचणार नाही’

तुम्हाला काय झालं, तर मी यांचं जीनं मुश्किल करेन. तुम्ही खाली या, तुमची कुटुंबाला गरज आहे. आपल्याला संतोष भय्याला न्याय द्यायचा आहे. माझा समाज तुमच्या पाठिशी आहे. आत्महत्या करायची नाही, खाली या, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या भावाला धनंजय देशमुख यांना विनंती केली. मस्साजोगमधील गावकऱ्यांनी सोमवारी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. यामध्ये सरपंच संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख देखील सहभागी होते. यानंतर पाण्याच्या टाकीवर चढलेल्या धनंजय देशमुख यांना खालून फोन करून मनोज जरांगे पाटील यांनी त्यांची समजूत काढल्यानंतर ते खाली उतरले.

Devendra fadnavis & Manoj Jarange Patil
MLA Sandeep Kshirsagar : धनंजय मुंडेंचा राजीनामा अन् वाल्मीक कराडला फाशी झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही!

दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडवर मोक्का लावावा, अशी मागणी आक्रमक ग्रामस्थांकडून केली जात आहे. या मागणीसाठी मस्साजोगच्या ग्रामस्थांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. मस्साजोगमधील ग्रामस्थांकडून सकाळपासूनच पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले.

Devendra fadnavis & Manoj Jarange Patil
Devendra Fadnavis : महापालिका निवडणुका कधी होणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्टच केले

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com