Devendra Fadnavis Action : मंत्री कार्यालयातील 550 जणांची हाकलपट्टी, CM देवेंद्र फडणवीस 'अ‍ॅक्शन मोड'वर

Mantralaya Update Minister Offices : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी अ‍ॅक्शन घेत मंत्रालयामध्ये मंत्र्यांच्या कार्यालयात नियमबाह्यपद्धतीने कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ विभागात परत पाठवले आहे.
Around 550 employees working in ministerial offices at Mantralaya have returned to their respective parent departments.
Around 550 employees working in ministerial offices at Mantralaya have returned to their respective parent departments.Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Mantralaya : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयामध्ये कार्यरत असलेल्या तब्बल 550 कर्मचाऱ्यांबाबत मोठी निर्णय घेतला. मंत्री कार्यालयात बाह्यस्त्रोत, उसनवारी तसेच मौखीक पद्धतीने असलेल्या या 550 कर्मचाऱ्यांना त्यांना मूळ विभागात परत पाठवले आहे.

नवीन मंत्री तात्पुरत्या स्वरुपात काही कर्मचारी आपल्यासाठी घेत असतात. दुसऱ्या विभागातून आपल्या विभागात घेतलेल्या कर्मचारी हे नियम बाह्यापद्धतीने घेतल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ विभागात जाण्याचे निर्देश देण्यात आले होते.

सामान्य प्रशासन विभागाने फक्त तोंडीपद्धीने आणि उसनवारीवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ विभागात जाण्यासाठी 10 सप्टेंबरपर्यंतचा वेळ दिला होता. तसेच ते कर्मचारी मूळ विभागात परतले नाहीत तर त्यांचे पगार रोखण्याची कारवाई करण्याची तंबी दिली होती. अखेर 550 पण जण आपल्या मूळ विभागात परतले आहेत.

Around 550 employees working in ministerial offices at Mantralaya have returned to their respective parent departments.
Devendra Fadnavis news : मंत्रालयात अधिकाऱ्यांची उसनवारी, प्रतिनियुक्तीवर CM फडणवीसांचा घाव; सर्व नेमणुका रद्द करण्याचे आदेश, परवानगी न घेतल्यास थेट कारवाई

मंत्र्यांमध्ये नाराजी

मंत्र्याकडे असलेले कर्मचारी हे कामकाजासाठी अपुरे पडत असतात. त्यामुळे उसनवारी, अथवा तोंडी पद्धतीने दुसऱ्या विभागातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती ही मंत्री कार्यालयात केली जात होती. सवलतीचा फायदा घेत मंत्री आपल्याला हवे असलेले अधिकारी, कर्मचारी आपल्या मंत्री कार्यालयात कार्यरत ठेवत होते. हे कर्मचारी मंत्र्यांच्या विश्वासतले असत. मात्र, अनेक कर्मचाऱ्यांची नियुक्ती ही नियमबाह्य पद्धतीने असल्याचे निदर्शनास आल्याने त्या कर्मचाऱ्यांना मुळ विभागात पाठवण्यात आले. मात्र, या कारवाई मंत्र्यांमध्ये नाराजी आहे.

मंत्री कार्यालयावर मुख्यमंत्र्यांचे नियंत्रण?

आवडते कर्मचाऱ्याना पुन्हा त्यांच्या मूळविभागात पाडवल्याने मंत्र्यांमध्ये नाराजी आहे. शिवाय नवीन कर्मचारी नियुक्त करताना त्या कर्मचाऱ्यांची पडताळणी मुख्यमंत्री कार्यालयकडून होणार आहे. त्यामुळे मंत्र्यांच्या कार्यालयावर मुख्यमंत्री कार्यालयाचे नियंत्रण राहिली, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

Around 550 employees working in ministerial offices at Mantralaya have returned to their respective parent departments.
FDA food safety rules : गणेशोत्सवात महाप्रसादाचे आयोजन करण्यापूर्वी 'हे' नियम वाचा; FDA कडून मार्गदर्शक सूचना

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com