FDA food safety rules : गणेशोत्सवात महाप्रसादाचे आयोजन करण्यापूर्वी 'हे' नियम वाचा; FDA कडून मार्गदर्शक सूचना

Maharashtra FDA food safety rules : आयोजकांकडून मिळणाऱ्या पूर्वसूचनांनंतर प्रशासन संबंधित कार्यक्रमांच्या स्वरूपानुसार तपासणीचे नियोजन करणार आहे. गरज भासल्यास अन्नाचे नमुनेही घेतले जातील. तपासणीमध्ये अन्नसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई केली जाऊ शकते.
Food Safety | FDA Rules
Food Safety | FDA RulesSarkarnama
Published on
Updated on

FDA Food Safety : राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत असून गणरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ठिकठिकाणी महाप्रसादाचे आयोजन केले जात आहे. अनेक मंडळांकडून हजारो भाविकांसाठी भोजनाची व्यवस्था केली जाते. याशिवाय मंदिरांमध्ये, धार्मिक कार्यक्रमांत, यात्रा आणि उरुसाच्या ठिकाणीही मोठ्या प्रमाणावर अन्नवाटप केले जाते. मात्र, मोठ्या संख्येने नागरिकांना अन्न देताना त्याची गुणवत्ता आणि स्वच्छता अबाधित राहावी, यासाठी आता अन्न व औषध प्रशासनाने (FDA) विशेष नियमावली जाहीर केली आहे.

महाप्रसाद, भंडारा, अन्नछत्र किंवा लंगराचे आयोजन करणाऱ्या संस्थांना यापुढे कार्यक्रमाचे नियोजन करताना अन्नसुरक्षेच्या नियमांचा विचार करावा लागणार आहे. सामूहिक अन्नवाटपाचा कार्यक्रम असल्यास त्याची माहिती किमान सात दिवस आधी प्रशासनाला देणे अपेक्षित आहे. गणेश मंडळ किंवा इतर आयोजकांनी अन्न तयार करण्यासाठी परवानाधारक अथवा नोंदणीकृत केटररची निवड केल्यास संबंधित कार्यक्रमाची पूर्वमाहिती प्रशासनाकडे सादर करावी लागेल.

यासाठी पदनिर्देशित अधिकाऱ्याकडे विहित नमुन्यात माहिती देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे कार्यक्रम कुठे, कधी आणि कोणत्या पद्धतीने आयोजित केला जात आहे, याची माहिती FDAला आधीच उपलब्ध होणार आहे. महाप्रसादासाठी अन्न बनवताना केवळ पदार्थ चांगले असणे पुरेसे नसून त्याच्या हाताळणीवरही लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

स्वयंपाकासाठी वापरले जाणारे पाणी सुरक्षित असावे. कच्चा माल आणि तयार अन्न एकमेकांच्या संपर्कात येणार नाही, याची काळजी घ्यावी. अन्न योग्य तापमानात ठेवावे आणि साठवणुकीचीही योग्य व्यवस्था करावी. तसेच स्वयंपाक करणाऱ्या आणि अन्न वाढणाऱ्या व्यक्तींनी स्वच्छतेचे नियम पाळणे आवश्यक राहणार आहे.

Food Safety | FDA Rules
Mayawati news : पक्षप्रमुखांनी सांगताच माजी खासदाराचा थेट राजकारणातून संन्यास; काही तासांतच जावयालाही पक्षातून डच्चू

कार्यक्रमाची माहिती मिळताच FDAची नजर

आयोजकांकडून मिळणाऱ्या पूर्वसूचनांनंतर प्रशासन संबंधित कार्यक्रमांच्या स्वरूपानुसार तपासणीचे नियोजन करणार आहे. गरज भासल्यास अन्नाचे नमुनेही घेतले जातील. तपासणीमध्ये अन्नसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई केली जाऊ शकते.

सण कोणता, त्यानुसार FDAचे नियोजन

दरम्यान, सणांच्या काळात काही खाद्यपदार्थांची मागणी अचानक वाढत असल्याने भेसळीचा धोका लक्षात घेऊन FDAने वर्षभरासाठी स्वतंत्र नियोजन केले आहे. त्यासाठी सण आणि धार्मिक कार्यक्रमांचे तीन गट करण्यात आले आहेत. राज्यभर मोठ्या प्रमाणावर साजरे होणारे सण पहिल्या गटात आहेत. यामध्ये गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, ईद, नाताळ आणि नववर्ष पूर्वसंध्येचा समावेश आहे.

Food Safety | FDA Rules
SRA Program : पवारांच्या 4 पैकी 3 आमदारांना BLAची गरज वाटेना; फक्त जानकरांच्या मतदारसंघात नियुक्ती, भाजप पहिल्या स्थानी, राष्ट्रवादीचा भोपळा

दुसऱ्या गटात प्रादेशिक पातळीवर महत्त्व असलेले सण आणि कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत. यात मकर संक्रांती, महाशिवरात्र, होळी, गुढीपाडवा, आषाढी व कार्तिक वारी, श्रावण मास, जन्माष्टमी, दहीहंडी, कोजागिरी आणि गुरुनानक जयंती यांचा समावेश आहे. तर स्थानिक पातळीवरील कार्यक्रमांसाठी तिसरा गट तयार करण्यात आला असून त्यात जत्रा, पालखी सोहळे आणि उरुसांचा समावेश आहे.

सणासुदीला मिठाई, खवा, पनीरसह मटण आणि चिकनच्या विक्रीतही मोठी वाढ होते. या काळात भेसळ किंवा खराब अन्नपदार्थ नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू नयेत, यासाठी प्रशासनाकडून विशेष लक्ष दिले जाणार आहे. अन्नपदार्थांच्या गुणवत्तेच्या बाबतीत सरकारची भूमिका कठोर असल्याचे FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com