Sharad Pawar News : शरद पवारांची 'ही' राजकीय भविष्यवाणी गाजणार, प्रचारात धुरळा उडणार

Sharad Pawar On Narendra Modi : पंतप्रधान मोदी यांच्याशी जुळवून घेणं किंवा त्यांचे विचार पचणी पडणं आमच्यासाठी अवघड असल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं.
sharad pawar
sharad pawarsarkarnama

पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ), गृहमंत्री अमित शहा ( Amit Shah ) यांच्या राजकीय डावपेचांना शह देण्यासाठी विरोधकांच्या विशेषत: काँग्रेसच्या ( Congress ) गोटात जबरदस्त हालचाली होण्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) अध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहेत. भविष्यात मोदी, शहांच्या राजकारणाला कंटाळलेले, वैतागलेले प्रादेशिक पक्ष काँग्रेसचा 'हात' मजबूत करण्यासाठी विलीन होण्याची शक्यता पवार यांनी वर्तवली आहे. परिणामी पवार यांच्या या भाकितामुळे राजकीय चर्चेला तोंड फुटणार हे निश्चित. त्याचवेळी भविष्यात पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही काँग्रेसमध्ये विलीन होणार का? अन्य कोणते प्रादेशिक काँग्रेसशी हातमिळवणी करतील, याचीही चर्चा आत्तापासून राज्याच्या आणि पर्यायानं देशाच्या राजकारणात होऊ शकते.

दुसरीकडे पवार ( Sharad Pawar ) यांच्या राजकीय भविष्यवाणीने सत्ताधारी भाजपमध्ये त्याचे पडसाद उमटू शकतात. त्यामुळे या पक्षाचे नेते आता प्रचाराच्या झंझावातात काय भूमिका मांडणार याकडे लक्ष राहील. अर्थात पक्ष विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून लोकसभा निवडणुकीतील चौथा आणि पाचवा टप्पा गाजणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार म्हणाले, "पुढील दोन वर्षात विविध प्रादेशिक पक्ष काँग्रेसबरोबर अधिक समन्वयाने काम करतील. यापैकी काही प्रादेशिक पक्ष हे त्यांचं हित लक्षात घेऊन काँग्रेसमध्ये विलीन होतील."

विलनीकरणाचा हाच निकष राष्ट्रवादीबाबत ( शरदचंद्र पवार ) लागू होईल का? या प्रश्नावर शरद पवार यांनी म्हटलं, "मला काँग्रेस आणि राष्ट्रवादीत कोणताही फरक दिसत नाही. वैचारकिदृष्ट्या आम्ही गांधी, नेहरूंची विचारसरणी मानणारे आहोत."

sharad pawar
Sharad Pawar News : "मोदींनी तर कुठं कुटुंब सांभाळलं", शरद पवारांनी दाबली दुखरी नस

"प्रादेशिक पक्ष काँग्रेससोबत एकत्र येण्याच्या प्रक्रियेबाबत मी आत्ताच बोलू शकणार नाही. सहकाऱ्यांशी चर्चा केल्याशिवाय काहीही बोलणार नाही. वैचारिकदृष्ट्या आमचा पक्ष काँग्रेसच्या जवळचा आहे. पण, आमच्या पक्षाबाबत कोणतंही पाऊल उचलताना किंवा रणनीती ठरवताना सामूहिक पद्धतीनं निर्णय घेतला जाईल. पंतप्रधान मोदी यांच्याशी जुळवून घेणं किंवा त्यांचे विचार पचनी पडणं आमच्यासाठी अवघड आहे," असं शरद पवार यांनी सांगितलं.

राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या फुटीवर शरद पवार म्हणाले, "ज्यांनी मोदी यांना साथ दिली आहे, त्यांना जनता पसंत करत नाही."

sharad pawar
Sharad Pawar : 'सत्तेचा माज उतरवायला वेळ लागणार नाही', शरद पवारांनी ठणकावले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com