Maratha Reservation: मोठी बातमी: फडणवीस सरकार मराठा आरक्षणासाठी पुन्हा 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; 'ती' चूक सुधारली

Manoj Jarange Protection : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आझाद मैदानावर केलेल्या उपोषणानं सरकारला घाम फोडला होता. यावेळी सरकारनं जरांगेंना मराठा समाजातील बांधवांना हैदराबाद गॅझेट लागू करून ओबीसी प्रमाणपत्र देण्याचं आश्वासन दिलं होतं.
Manoj Jarange Patil CM Devendra Fadnavis
Manoj Jarange Patil CM Devendra Fadnavis Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आझाद मैदानावर केलेल्या उपोषणानं सरकारला घाम फोडला होता. यावेळी सरकारनं जरांगेंना मराठा समाजातील बांधवांना हैदराबाद गॅझेटियर लागू करून ओबीसी प्रमाणपत्र देण्याचं आश्वासन दिलं होतं. पण सरकारकडून मराठा आरक्षणातंर्गत हैदराबाद गॅझेटियर लागू करत कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात प्रक्रियेनं वेग पकडला नसल्याचं दिसून येत आहे. यामुळे मराठा समाजातला रोष वाढतो आहे. आता याचसंदर्भात नवी अपडेट समोर येत आहे.

राज्य सरकारनेच तब्बल सहा महिन्यांनंतरही हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या संदर्भातील स्पष्ट कार्यपद्धती (SOP) निश्चित करण्यात आली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. सरकारने हैदराबाद गॅझेट संदर्भातील कार्यपद्धतीच निश्चित नसल्यामुळे मराठा समाजाकडूनच अर्ज कमी प्रमाणात दाखल होत असल्याची माहितीही सरकारनं दिली होती.

आता या दिरंगाईनंतर सरकार खडबडून जागे झाले आहे. सरकारकडून लवकरच हैदराबाद गॅझेट लागू करण्याबाबतचीआवश्यक ती स्पष्ट कार्यपध्दती ठरवणारी नवी समिती स्थापन करण्यात आली आहे.

मराठा आरक्षणासंदर्भातील राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी हैदराबाद गॅझेटच्या अंतर्गत कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यास होत असलेल्या दिरंगाईबाबत खुलासा करण्याची मागणी जोर धरू लागली होती.त्याच पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी याबाबतची स्पष्ट भूमिका मांडली आहे.

Manoj Jarange Patil CM Devendra Fadnavis
Maharashtra New Scam: फडणवीस सरकार हादरलं, हजारो कोटींच्या नव्या घोटाळ्याचा पर्दाफाश,सहा शहरांमध्ये छापेमारी

राज्य सरकारची नवी समिती छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयाच्या अधिपत्याखाली तयार करण्यात आली आहे. या समितीला हैदराबाद गॅझेटच्या आधारे मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी अथवा मराठा-कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी आवश्यक असलेली कार्यपद्धती ठरवण्याचा अधिकार असणार आहे

ही नवी समिती छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयाच्या अधिपत्याखाली तयार करण्यात आली आहे. या समितीला हैदराबाद गॅझेटच्या आधारे मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी अथवा मराठा-कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी आवश्यक असलेली कार्यपद्धती ठरवण्याचा अधिकार असणार आहे.

Manoj Jarange Patil CM Devendra Fadnavis
Rajya Sabha Election: आदित्य ठाकरेंनीच पलटवला संजय राऊतांचा डाव..., 2028 ला राज्यसभेच्या खासदारकीची वाट अवघड?

नव्या समितीकडून तयार करण्यात आलेली नवी कार्यपद्धती राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. सरकारच्या मंजुरीनंतरच हैदराबाद गॅझेटच्या आधारे मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी अथवा मराठा-कुणबी प्रमाणपत्र प्रमाणपत्र वितरण प्रक्रिया वेग पकडणार असल्याची माहिती अधिकृत आदेशातून समोर येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com