Maharashtra New Scam: फडणवीस सरकार हादरलं, हजारो कोटींच्या नव्या घोटाळ्याचा पर्दाफाश,सहा शहरांमध्ये छापेमारी

Maharashtra Scam : राज्य सरकारच्या 'सौरकृषी ऊर्जा वाहिनी 2.0' योजनेअंतर्गत धक्कादायक बाब समोर आली आहे. एकूण 122.85 कोटी रुपयांच्या बँक गॅरंटी घोटाळ्यानं राज्य सरकारसह महावितरणचेही धाबे दणाणले आहेत.
Mahayuti Government scam
Mahayuti Government scam sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारकडून एकापाठोपाठ एक अशा धडाकेबाज निर्णयांचा सिलसिला सुरू आहे. त्याचसोबत सरकार आपली पारदर्शी कारभार ही प्रतिमा जपण्याचा अतोनात प्रयत्न करताना दिसून येत आहे. तरीदेखील विरोधकांकडून सरकारवर काही घोटाळ्यांचे आरोप करण्यात आले आहेत. याचदरम्यान, आता फडणवीस सरकारला हादरवणारा घोटाळा उघडकीस आला आहे.

राज्य सरकारच्या 'सौरकृषी ऊर्जा वाहिनी 2.0' योजनेअंतर्गत धक्कादायक बाब समोर आली आहे. एकूण 122.85 कोटी रुपयांच्या बँक गॅरंटी घोटाळ्यानं राज्य सरकारसह महावितरणचेही धाबे दणाणले आहेत. काही कंपन्यांनी सरकारच्या'सौरकृषी ऊर्जा वाहिनी 2.0' योजनेअंतर्गत सौर ऊर्जा निर्मितीची कंत्राटे मिळवण्यासाठी थेट बनावट बँक गॅरंटी सादर केल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे.

महाराष्ट्र सरकारच्या 'सौरकृषी ऊर्जा वाहिनी 2.0' योजनेअंतर्गत झालेल्या घोटाळ्याप्रकरणी एकूण 122.85 कोटी रुपयांचा आर्थिक फटका सरकारला बसल्याचे समोर येत आहे. या सगळ्या कारवाईनंतर पोलिसांच्या रडारवर संबंधित कंत्राटं मिळवणाऱ्या बड्या कंपन्या निशाण्यावर आल्या आहेत.

याप्रकरणी मे. नाकॉफ ऊर्जा आणि एनओपीएल प्रोजेक्ट्स- सुमारे 48.45 कोटी, मे. इंटिग्रेशन इंडक्शन पॉवर लिमिटेड- हिंगोली आणि परभणी येथील प्रकल्पांसाठी 13.65 कोटी, मे. नाकॉफ ऊर्जा आणि एनओपीएल पेस ग्रीन 49.50 कोटी, आणि मे. ऑनिक्स रिन्युएबल व ऑनिक्स आयपीपी 11.25 कोटी असा एकूण 122.85 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचं समोर येत आहे.

Mahayuti Government scam
Dhananjay Munde : तात्काळ पंचनामे करा, अन्यथा...; अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांसाठी धनंजय मुंडे मैदानात, अधिवेशनात केली 'ही' मोठी मागणी

राज्य सरकारच्या 'सौरकृषी ऊर्जा वाहिनी योजनेअंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी आणि वीज खरेदी करार करण्यासाठी संबंधित कंत्राटदार कंपन्यांना सुरक्षा ठेव म्हणून बँकेची हमी बंधनकारक असते. संबंधित आरोपी कंपन्यांनी विविध बँकांचेच बनावट रबरी शिक्के तयार करत खोट्या बँक गॅरंटी सादर केल्याची धक्कादायक बाब समोर आल्यानं प्रशासनाचं धाबं दणाणलं.

मिळालेल्या माहितीनुसार, महावितरणनं ज्यावेळी यासंबंधित कंपन्यांनी दिलेल्या कालावधीत कामं मार्गी न लावल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या होत्या.यानंतर महावितरणने कंत्राटदार कंपन्यांच्या बँक गॅरंटी वटवण्यासाठी बँकेकडे पाठवल्या होत्या. त्यावेळी बँकांनी याप्रकरणी हात झटकत या गॅरंटी आमच्या नाहीत असा खुलासा केल्यानं संबंधित घोटाळ्याचा पर्दाफाश करण्यात आला.

Mahayuti Government scam
Maharastra Government: राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय; 7/12 उताऱ्यात होणार मोठा बदल; फार्मर आयडी प्रक्रिया सुरु

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत 10 हजार कोटींचा महाघोटाळा झाला असल्याचा गंभीर आरोप यापूर्वी फेसबुकवर पोस्ट करत केला होता. त्यात त्यांनी या घोटाळ्याची सखोल चौकशी होऊन वसुली होणार का? असा सवालही उपस्थित केला होता.

दानवेंची पोस्ट काय?

विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी लिहिलेल्या पोस्टमध्ये “महाराष्ट्राची महालुट! मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत 10,000 कोटींचा ‘महा-घोटाळा’ झाल्याचा आरोप केला आहे. NOPL Green, NACOF, IIPL आणि ONIX सारख्या कंपन्यांनी चक्क ‘बनावट बँक गॅरंटी’ देऊन कंत्राटं लाटली? महावितरणचे अधिकारी आणि कंपन्यांचे संचालक (दिव्येश सावलिया, पी. सुरेश बाबू इ.) यांच्या संगनमताने शेतकऱ्यांच्या नशिबी अंधार टाकण्याचा हा प्रयत्न आहे का? EOW कडे 5 गुन्हे दाखल होणे ही नामुष्की असल्याचा हल्लाबोलही दानवेंनी पोस्टद्वारे केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com