Jadhav apologized Jarange : संजय जाधवांनी मागितली जरांगे पाटलांची जाहीर माफी : माझ्यावर बोलण्याचा तुम्हाला नैतिक अधिकार; भावना दुखावल्या असतील तर...

Eknath Shinde Parbhani Tour : परभणी मेळाव्याच्या मुद्द्यावर शिवसेना खासदार संजय ऊर्फ बंडू जाधव यांनी मनोज जरांगे पाटील यांची जाहीर माफी मागितली. भावना दुखावल्या असल्यास दिलगिरी व्यक्त करत कटुता न ठेवण्याचे आवाहन केले.
Sanjay Jadhav-Manoj Jarnge Patil
Sanjay Jadhav-Manoj Jarnge PatilSarkarnama
Published on
Updated on

Parbhani, 30 August : परभणीचा मेळावा ७ जुलैला होणार होता. पण, तो रद्द झाला होता. आता पुन्हा मेळावा रद्द करण्याची वेळ आली असती तर मला खूप मोठ्या संकटाचा सामना करावा लागला असता. माझ्यावर बोलण्याचा तुम्हाला नैतिक अधिकार आहे. पण, तुमच्या भावना दुखावल्या असतील तर मी जाहीरपणे तुमची माफी मागतो. पण मनात कुठेही कटुता येऊ देऊ नका. तुमच्या हाकेला ओ देण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत, अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार संजय ऊर्फ बंडू जाधव यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची जाहीर माफी मागितली.

मनोज जरांगे पाटील यांनी खासदार संजय जाधव यांना परभणीतील मेळावा रद्द करण्याची मागणी केली होती. तसचे काही गर्भित इशारेही दिले होते. त्या पार्श्वभूमीवर खासदार जाधव यांनी जाहीरपणे जरांगे पाटील यांची माफी मागितली आहे.

खासदार जाधव म्हणाले, परभणीच्या आजच्या मेळाव्याची गेली दोन महिन्यांपासून तयारी सुरू होती. यापूर्वी सात जुलैला मेळावा होणार होता. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजारी पडल्यामुळे तेव्हा मेळावा होऊ शकला नव्हता, त्यामुळे आजची ३० ऑगस्ट ही तारीख मेळाव्यासाठी मिळाली आणि आज तो मेळावा होत आहे.

मनोज जरांगे पाटील यांचं मी मनापासून स्वागत करतो. मी त्यांना विनंती केली, साहेब ११ वाजले आहेत आणि माझा ११ वाजताचा कार्यक्रम आहे. तुम्ही ११ वाजता म्हणता की, कार्यक्रम थांबवा. पण इथ जमलेल्या लोकांना मी काय उत्तर देऊ. हे लोक मला मारतील, उद्या तुम्हा माराल. मी तुमचं सगळं काही स्वीकारतो, असेही त्यांनी नमूद केले.

Sanjay Jadhav-Manoj Jarnge Patil
Eknath Shinde on Jarange Patil : एकनाथ शिंदेंचे मनोज जरांगे पाटलांना उत्तर : ‘मला कोणावर टीका करायची नाही; पण हा मेळावा....’

बंडू जाधव म्हणाले, जरांगेसाहेब, तुमच्या प्रती आदर कालही होता, आजही आहे आणि उद्याही राहील. तुम्ही मला जे काही बोलला आहात, तो तुमचा नैतिक अधिकार आहे. त्याचं मला थोडंही दुःख वाटलं नाही. पण मी प्रत्येक वेळी तुमच्या हाकेला ओ देऊन आलेलो आहे आणि उद्याही तुमच्यासाठी मी येईन. एवढी मी आपल्याला ग्वाही देतो.

आपण मनात कोठेही संकोच ठेवू नका. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आम्ही वेगळे नाहीत. दोन महिन्यांपासून हा मेळावा ठरला होता. तो ऐनवेळी रद्द केला असता तर सभेला जमलेले सर्वजण माझ्यासाठी...माझ्यावर काय संकट ओढावलं असतं. हे मी कल्पना करू शकत नाही. कारण ७ जुलैचा कार्यक्रम रद्द झाल्यावर माझा कार्यकर्ता, शेतकरी हवालदिल झाला होता, असेही खासदार जाधव यांनी नमूद केले.

Sanjay Jadhav-Manoj Jarnge Patil
Solapur Dcc Bank : जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत आमदार सुभाष देशमुखांची एन्ट्री : 'लोकमंगल'कडून ठराव, शहाजी पवारही मतदार...

ते म्हणाले, आज पुन्हा मेळावा रद्द करण्याची वेळ आली असती तर मला खूप मोठ्या संकटाचा सामना करावा लागला असता. तुमच्या भावना दुखावल्या असतील तर मी जाहीरपणे तुमची माफी मागतो. पण मनात तुम्ही कुठेही कटुता वाटू देऊ नका. तुमच्या हाकेला ओ देण्यासाठी आम्ही कधीही उभे आहोत. एवढं तुम्हाला आश्वासित करतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com