Maharashtra Breaking News LIVE : पुणेकरांना दिलासा, पाणी कपात होणार नाही

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : राज्यात देशातील अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Sarkarnama breaking news
Sarkarnama breaking newssarkarnama

पीएम मोदींच्या घोषणांवर शरद पवारांचं ट्विट; म्हणाले

केंद्र सरकारने मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या निर्णयांबाबत शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अलीकडील घोषणांमुळे देशातील नागरिक, उद्योग क्षेत्र आणि गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाल्याचे त्यांनी म्हटले. या निर्णयांचा अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतो, त्यामुळे परिस्थितीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे पवारांनी सांगितले.

धरणात पुरेसा साठा ३१ मे पर्यंत असल्याने पुणे शहरात कुठल्याही प्रकारची पाणी कपात नाही, अशी माहिती  प्रशासनाची दिली आहे. पुणे शहरात १५ टक्के पाणी कपात करा अशा सूचना पुणे महापालिकेला देण्यात आल्या होत्या मात्र खडकवासला धरण साखळी क्षेत्रामध्ये पुरेसा पाणीसाठा असल्याने ३१ मे पर्यंत शहरात पाणी कपात होणार नसल्याची माहिती महापौरांची दिली.

नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणात  रुपाली चाकणकर यांच्या एसआयटी चौकशीनंतर आता अंमलबजावणी संचालनालय (ED) आता त्यांची चौकशी करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ अजित पवार आज आसाम दौऱ्यावर आहेत. नव्याने निवडून आलेल्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.

STATE HEAT : राज्यात पुन्हा उष्णतेची तीव्र लाट

पुढील चार दिवस राज्यातील काही भागात उष्णतेची लाट असेल, अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. उत्तर-मध्य महाराष्ट्रात उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे... यामुळे नागरिकांच्या अंगाची काहिली होणार आहे.

पिंपळगाव जोगा धरणाचा कालवा फुटला, २५ एकर शेतीचे मोठे नुकसान

पिंपळगाव जोगा ता.जुन्नर येथील धरणाचा कालवा पिंपळगाव जोगा गावच्या हद्दीतच रात्री फुटला असून लाखो लिटर पाणी तर वाया गेलेच आहे.मात्र या कालवा फुटीच्या पाण्याने अंदाजे २५ एकर शेतीचे नुकसान होऊन शेतकऱ्यांचे ही मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी आजपासून विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणार आहे. नियमित शुल्कासह 21 मे पर्यंत तर विलंब शुल्कासह 25 मे पर्यंत अर्ज करता येणार असल्याचे राज्य परीक्षा मंडळाने कळविले आहे.

आसामच्या मुख्यमंत्रीपदाची आज हिमंत बिस्वा सरमा शपथ घेणार आहेत. दुसऱ्यांदा ते मुख्यमंत्रीपदी विराजमान होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com