Maharashtra Live Update : पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे OBC नेते लक्ष्मण हाकेंचे आवाहन

Political Breaking Live Headlines Updates : राज्यातील दुष्काळी आणि विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात शिवसेनेचे दोन दसरा मेळावे होत असून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाच्या तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मेळाव्याकडे लक्ष लागले आहे. यासह महत्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर.....
Maharashtra Live Politics Update
Maharashtra Live Politics UpdateSarkarnama

Solapur News : पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे OBC नेते लक्ष्मण हाके यांचे आवाहन

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीकडून धनदांडग्यांना उमेदवारी देण्यात आल्याचा आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला आहे. दोन्ही बाजूकडील उमेदवारांना बेरोजगार पदवीधर आणि शिक्षकांच्या समस्यांची जाण नाही. भाजपचे शिक्षक उमेदवार कौस्तुभ गावडे आणि शरद पवार राष्ट्रवादीच्या उमेदवार हर्षदा देशमुख या सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आले आहेत. त्यामुळे OBC आणि VJNT बेरोजगार तरुणांनी पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकावा, असे आवाहन लक्ष्मण हाके यांनी केले आहे.

Share Market : सेन्सेक्स 876 अंशांनी घसरला; खासगी बँका, आयटी कंपन्यांच्या शेअरमध्ये विक्रीचा दबाव

खासगी बँका आणि आयटी कंपन्यांच्या शेअरमध्ये झालेल्या विक्रीमुळे भारतीय शेअर बाजारातील दोन दिवसांची तेजी आज थांबली. सेन्सेक्स 876.37 अंशांनी, तर निफ्टी 257.20 अंशांनी घसरला. दोन्ही प्रमुख निर्देशांकांत एक टक्क्यापेक्षा अधिक घट झाली.

खासगी बँका आणि आयटी कंपन्यांच्या शेअरमध्ये झालेल्या विक्रीमुळे भारतीय शेअर बाजारातील दोन दिवसांची तेजी आज थांबली. सेन्सेक्स 876.37 अंशांनी, तर निफ्टी 257.20 अंशांनी घसरला. दोन्ही प्रमुख निर्देशांकांत एक टक्क्यापेक्षा अधिक घट झाली.Nagpur News : संघाचा आज विजयादशमी उत्सव; मोहन भागवत, संजय गुप्ता आणि जगदीप धनखड यांची उपस्थिती

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर महानगरातर्फे विजयादशमी उत्सवाचे आयोजन आज सकाळी रेशीमबाग मैदानावर करण्यात आले आहे. संघाच्या शताब्दी वर्षाच्या समारोपानिमित्त आयोजित या उत्सवाला ज्येष्ठ संपादक संजय गुप्ता प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे मार्गदर्शन यावेळी लाभणार आहे. माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड तसेच पश्चिम-मध्य भारतातील इस्राईलचे महावाणिज्यदूत यानिव रेवाच हे निमंत्रित अतिथी आहेत.

Mumbai News : शिवसेनेचा आज दसरा मेळावा; उद्धव ठाकरेंच्या भाषणाकडे लक्ष

शिवसेनेच्या सहा दशकांच्या राजकीय परंपरेचा वारसा सांगणारा दसरा मेळावा मंगळवारी (ता. 20) दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर होणार आहे. सायंकाळी पाचला होणाऱ्या या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसेना कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. शिवसेनेच्या स्थापनेला यंदा 60 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com