नाशिक जिल्ह्यातील सिन्नरच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी मुसळगाव येथे 300 एमव्हीए क्षमतेचे नवीन वीज पारेषण उपकेंद्र उभारण्यात येणार आहे. या उपकेंद्राचे भूमिपूजन शनिवारी झाल्याने त्याच्या उभारणीला वेग येणार असून, येथील उद्योगांना पुरेशा दाबाने मुबलक वीज उपलब्ध होणार आहे. मुसळगाव येथे टॅरिफ बेस्ड कॉम्पिटिटिव्ह बिडिंग अंतर्गत 220/132/33 के.व्ही. क्षमतेचे हे वीज उपकेंद्र उभारले जाणार आहे.