Maharashtra Politics Live Update : 'सीजेपी'च्या जंतर-मंतरवरील आंदोलनाची तारीख जाहीर

Political Breaking Live Headlines Updates : 'सीजेपी'च्या जंतर-मंतरवरील आंदोलनाची तारीख जाहीर, पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच, शरद पवार दुष्काळ पाहणी दौऱ्यावर यासह राज्य आणि देशभरातली महत्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर
Maharashtra Politics Live Update
Maharashtra Politics Live UpdateSarkarnama

 भाजप विधानपरिषद उमेदवारांची यादी आज जाहीर होणार 

भाजपच्या विधानपरिषद उमेदवारांची यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण दिल्ली दौऱ्यावर असून, ते राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची भेट घेणार आहेत.

पंतप्रधान तीन नोव्हेंबरला बारामतीमध्ये येणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन नोव्हेंबरला बारामतीमध्ये येणार असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली. येत्या ३ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान मोदी बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या परिसराला भेट देणार आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बारामतीतील प्रशासकीय तसेच राजकीय हालचालींना वेग आला आहे.

महायुतीत बंडखोरी, भैय्या माने अपक्ष लढणार

पुणे पदवीधर मतदारसंघात भैय्या माने यांची बंडखोरी केली आहे. माझ्या भविष्याच्या आड येऊ नये, असे सांगत भैय्या माने यांनी पदवीधर निवडणूक लढवण्याचा केला निर्धार. आज पासून माझा आणि भैया माने यांचा संबंध संपला. असे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी भैय्या माने यांच्या बंडखोरी नंतर प्रतिक्रिया देताना सांगितले.

गोकुळचा महायुतीच्या निर्णयासाठी दिल्लीत जाणार- सतेज पाटील

महायुतीचा गोकुळमधील वाद स्थानिक पातळीवर सुटला नसल्याने सर्वपक्षीय नेत्यांना मुंबई गाठावी लागली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली तिढा सुटेल अशी अपेक्षा असताना आता आमदार सतेज पाटील यांनी मोठा गौप्यस्फ़ोट केला आहे. महायुतीमधील जागावाटपाचा तिढा मुंबईत देखील सुटत नसल्याने थेट सर्वपक्षीय नेते दिल्लीत जाणार असल्याचं खबळजनक दावा काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी आज केला. ते कोल्हापुरात बोलत होते.

नाशिकमध्ये दोन बांगलादेशी नागरिक ताब्यात

नाशिक पोलिसांनी दोन बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतली आहे. गेले काही दिवस पाळत ठेवून ही कारवाई करण्यात आली. या अवैध वास्तव्य असलेल्या नागरिकांनी अन्य बांगलादेशी नागरिकांची कसून तपासणी सुरू आहे. बांगलादेशातून अवैध मार्गे भारतात प्रवेश केलेल्या दोन बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांनी बनावट कागदपत्र तयार करून गेली अनेक दिवस वास्तव्य केले होते. नाशिकच्या नवनाथ नगर भागातून त्यांना अटक करण्यात आली.

स्कूल बस खड्ड्यात पलटी, महामार्गावर भीषण अपघात! विद्यार्थी जखमी

नांदेड-नागपूर महामार्गावर स्कूलबसचा भीषण अपघात झाला आहे. अर्धापूर तालुक्यात बोलेरो पिकप आणि स्कूल बसचा भीषण अपघात झाला. पिकपने स्कूल बसला पाठीमागून धडक दिल्याने ती बाजु्च्या खड्ड्यात पलटी झाली. या अपघातात चालकासह महिला आणि लहान मुलगी गंभीर जखमी झाले आहेत.

'सीजेपी'च्या जंतर-मंतरवरील आंदोलनाची तारीख जाहीर

अभिजीत दीपके यांनी दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करण्याची तारीख जाहीर केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी हे आंदोलन होणार आहे.जर ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा दिला नाही तर १० ऑक्टोबर रोजी देशभरातील 'काॅक्रोच' दिल्लीकडे कूच करतील आणि जंतर-मंतरवर आंदोलन करतील, असे ते म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com