Ramesh Bornare
Ramesh Bornare Sarkarnama

शिवसेनेच्या मागचं शुक्लकाष्ठ संपेना; आमदार बोरनारेंसह १० जणांवर गुन्हा दाखल

Shivsen | MLA Ramesh Bornare : शिवसेनेचा आणखी एक लोकप्रतिनिधी अडचणीत
Published on

औरंगाबाद : वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमासाठी आलेल्या भाऊ आणि त्यांच्या पत्नीला घराबाहेर बोलावून आपल्या साथीदारांच्या मदतीने राडा घालत मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचे वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे (Ramesh Bornare), त्यांच्या पत्नी संगीता रमेश बोरनारे (Sangita Boranare) यांच्यासह १० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी (ता.१८) दुपारच्या सुमारास शहरातील गोदावरी कॉलनीत ही घटना घडली. त्यामुळे शिवसेनेचा आणखी एक लोकप्रतिनिधी अडचणीत आला आहे.

यापूर्वी शिवसेनेच्या कोट्यातून राज्यमंत्री असलेले बच्चु कडू (Bacchu Kadu), शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित (Rajendra Gavit) यांना न्यायालयाने वेगवेगळ्या कारणास्तव शिक्षा सुनावली आहे. त्यापाठोपाठ राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेले शिवसेनेचे उपनेते रघुनाथ कुचिक (Raghunath Kuchik) यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आता शिवसेना आमदार रमेश बोरनारे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या मागचं शुक्लकाष्ठ संपताना दिसत नाही.

Ramesh Bornare
महापौर मोहोळांनी अखेर संधी साधलीच! पंतप्रधान मोदी ६ मार्चला पुण्यात

याबाबत जयश्री दिलीप बोरनारे (रा. सटाना, ता. वैजापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आमदार रमेश नानासाहेब बोरनारे, पत्नी संगीता रमेश बोरनारे, संजय नानासाहेब बोरनारे, दीपक बाबासाहेब बोरनारे, अजिंक्य संपत बोरनारे, रणजित मधुकर चव्हाण, संपत नानासाहेब बोरनारे, अबोली संजय बोरनारे, वर्षा संजय बोरनारे, दिनेश शाहू बोरनारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सटाना येथील जयश्री बोरनारे व दिलीप बोरनारे हे पती-पत्नी शुक्रवारी वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमासाठी दुपारी शहरातील गोदावरी कॉलनीत आले होते. त्यावेळी दिलीप यांचे चुलतभाऊ आमदार रमेश बोरनारे आणि त्यांच्या पत्नी संगीता बोरनारे यांच्यासह इतर आठ लोकांनी मिळून जयश्री व दिलीप यांना घरातून बाहेर बोलावून तुम्ही भाजपच्या कार्यक्रमात जाऊन आमची बदनामी करत आहात, असे म्हणत मारहाण करण्यास सुरवात केली.

Ramesh Bornare
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णब गोस्वामी यांच्यानंतर आता सोमय्या अडकणार?

दरम्यान, वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमात अचानक आमदार व त्यांचे भाऊ महिलेला मारहाण करत असल्याचे बघून घटनास्थळी मोठी गर्दी जमली. जमलेले पाहुणे देखील अचंबित झाले. यानंतर पिडीत पती-पत्नीने थेट वैजापूर पोलिस ठाणे गाठले. मात्र तक्रार दाखल करण्यास पोलिस चाल-ढकल करत असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला. मात्र पोलिसांनी तक्रार दाखल न केल्यास ठाण्यातच आत्महत्या करण्याचा इशारा फिर्यादी बोरनारे पती-पत्नी यांनी दिला. अखेर रात्री साडेनऊ वाजता आमदार बोरनारे आणि त्यांच्या पत्नीसह १० जणांविरोधात शिविगाळ व मारहाण केल्याप्रकरणी १४३, १४७, ३२३, ५०४, ५०६ या कलमान्वये गुन्हा दाखल झाला. घटनेचा तपास उपविभागीय अधिकारी कैलास प्रजापती करत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com