महापौर मोहोळांनी अखेर संधी साधलीच! पंतप्रधान मोदी ६ मार्चला पुण्यात

PM Narendra Modi | Pune Visit | Murlidhar Mohol : निवडणुकीच्या तोंडावर पुणे भाजपच्या अंगात दहा हत्तींचे बळ येणार
Murlidhar Mohol - Narendra Modi
Murlidhar Mohol - Narendra Modi Sarkarnama

पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पुणे दौऱ्यावर (Pune Visit) येणार आहेत. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी याबाबत माहिती दिली. पंतप्रधान मोदी यांच्या या दौऱ्यात मेट्रोच्या दोन टप्प्यांसह अनेक महत्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात येणार आहे. बुहूप्रतिक्षीत मेट्रोच्या फुगेवाडी ते पिंपरी आणि वनाज ते गरवारे महाविद्यालय या दोन टप्प्यांचे उद्घाटन होणार आहे. तसेच पंतप्रधानांची जाहिर सभा देखील होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर पुणे भाजपच्या अंगात दहा हत्तींचे बळ येणार आहे.

यापूर्वी पंतप्रधान मोदी हे २८ जानेवारी रोजी पुण्याच्या दौऱ्यावर येणार होते. त्यावेळी त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचं उद्घाटन होणार होते. यात पुणे मेट्रोचे उद्घाटन, महापालिकेच्या इमारतीतील छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण, दिवंगत ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर. के लक्ष्मण यांच्या नावाने असलेल्या कलादालनाचे उद्घाटन त्यांच्या दौऱ्याची तयारीही जिल्हा प्रशासनाकडून तयारी करण्यात आली होती. मात्र वाढत्या कोरोनाच्या (Corona Cases)पार्श्वभूमीवर हा दौरा रद्द करण्यात आला होता.

Murlidhar Mohol - Narendra Modi
सुशांतची हत्याच अन् मातोश्रीवरील चौघांना लवकरच ईडीची नोटीस! राणेंनी टाकला बॉम्ब

त्यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गेल्या महिन्यात पुणे दौऱ्यावर आले होते. अमित शहा यांनी त्यावेळी महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडत पुणे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता. तसेच महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे भूमिपूजन केले होते. त्यानंतर आता अखेरीस पंतप्रधान मोदी यांच्या पुणे दौऱ्याला मुहूर्त लागला आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर त्यांचा हा दौरा अत्यंत महत्वाचा मानला जात आहे.

Murlidhar Mohol - Narendra Modi
संजय राऊतांनी तासभर आरोप केले; पण फडणवीसांनी एकाच वाक्यात उत्तर दिले...

मेट्रोच्या उद्घाटनासाठी मोदी पुण्यात येणार असल्याने भाजपने त्याचबरोबर संगमवाडी ते बंडगार्डन हा नदी काठ सुधार प्रकल्पाचे भूमिपूजन, पंतप्रधान आवाज योजनेतील १ हजार घरांची लॉटरी, पीएमपीच्या ७० ई बसेसचे लोकार्पण, आर. के. लक्ष्मण आर्ट गॅलरीचे व महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे उद्घाटन यासह इतर कार्यक्रमांचा यात समावेश असेल, अशी माहिती मुरलीधर मोहोळ महापौर यांनी सरकारनामाशी बोलताना दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com