Abdul Sattar News : अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसासाठी लाखोंच्या सभा होणारे मैदान निवडले!

A large ground was chosen for the birthday of former minister Abdul Sattar : पहिल्यादांच सत्तार यांचा वाढदिवस मतदारसंघाबाहेर आणि लाखोंची गर्दी सामावू शकेल, अशा मैदानावर घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
Abdul Sattar
Abdul Sattar Sarkarnama
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : मंत्रीमंडळात संधी न मिळालेले माजी मंत्री (Abdul Sattar) अब्दुल सत्तार ' मी नाराज नाही, पण अडीच वर्षांनी पुन्हा येईन', असे म्हणत विरोधकांना इशारा देऊ पाहत आहेत. मंत्री नसलो तरी आपले राजकीय वजन तसूभरही कमी झालेले नाही, हे दाखवण्यासाठी अब्दुल सत्तार आणि त्यांच्या समर्थकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.

1 जानेवारी रोजी अब्दुल सत्तार यांचा वाढदिवस त्यांच्या सिल्लोड-सोयगाव मतदारसंघात दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अर्थात या वाढदिवसाला तेव्हा मंत्रीपदाचा रुबाब होता. महायुती (Mahayuti) सरकारच्या नव्या मंत्रीमंडळात यावेळी अब्दुल सत्तार यांना संधी मिळाली नाही. त्यांना डावलण्यामागे अनेक कारणे सांगितली जात आहेत.

Abdul Sattar
Abdul Sattar Meet Vilas Bhumre : अब्दुल सत्तार लागले कामाला; भेटीगाठीतून घेणार नाराजांचा कानोसा!

सत्तार मात्र आपला रुबाब अजूनही कायम असल्याचे दाखवण्याच्या प्रयत्नात आहेत. मंत्रीपदाशिवाय साजरा होणारा वाढदिवस दिमाखदार आणि शक्तीप्रदर्शन करणारा ठरावा यासाठी सत्तार समर्थक कामाला लागले आहेत. पहिल्यादांच सत्तार यांचा वाढदिवस मतदारसंघाबाहेर आणि लाखोंची गर्दी सामावू शकेल, अशा मैदानावर घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

Abdul Sattar
Shivsena News: शिवसेना नेत्याने सांगितली आतली माहिती; 'मंत्र्यांची दर तीन महिन्यांनी होणार...'

यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाची निवड करण्यात आल्याची माहिती आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अशा सगळ्याच पक्षांच्या नेत्यांनी आपल्या भाषणाने मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचे मैदान वेळोवेळी गाजवले आहे.

Abdul Sattar
Mahayuti Government : मंत्रालयातील दालनासाठी मंत्र्यांमध्ये चढाओढ; पालकमंत्रीपदावरून रुसवेफुगवे वाढले

आता याच मैदानावर माजी मंत्री अब्दुल सत्तार मंत्रीमंडळातून डावलल्यानंतरचा पहिला वाढदिवस साजरा करणार आहेत. यातून मोठे शक्तीप्रदर्शन करत अब्दुल सत्तार पुढच्या अडीच वर्षांनी मंत्रीमंडळात पुन्हा येण्यासाठी आतापासूनच दबावतंत्राचा वापर करत असल्याची चर्चा या निमित्ताने होत आहे. दरम्यान, सत्तार यांच्या या शक्तीप्रदर्शनावरून मंत्री संजय शिरसाट यांनी मात्र सत्तारांना टोला लगावला आहे. ते मोठे नेते आहेत, संभाजीनगरच काय? ते मुंबईतही वाढदविस साजरा करू शकतील, त्यांना शुभेच्छा असे म्हणत चिमटा काढला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com