Lok Sabha Election 2024 : शिंदेंनी नाकारताच विनोद पाटील फडणवीसांच्या दरबारी

Vinod Patil News : विनोद पाटील यांनी थेट नागपूर गाठत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दरबारात हजेरी लावल्याची माहिती आहे.
Devendra Fadnavis, Sandipan Bhumre, Vinod Patil
Devendra Fadnavis, Sandipan Bhumre, Vinod PatilSarkarnama

Chhatrapati Sambhajinagar Constituency : सर्वात आधी छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून (Lok Sabha Election 2024) निवडणूक लढवण्याची घोषणा करणारे मराठा आरक्षण याचिकाकर्ते आंदोलक विनोद पाटील यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उमेदवारी नाकारली आहे. शिवसेनेकडून लढण्यास इच्छुक असलेल्या पाटील यांना शिंदेंनी नाकारल्यावर आता ते अपक्ष लढण्याच्या तयारीत आहेत.

संभाजीनगरची जागा शिवसेना (Shiv Sena) शिंदे गटाकडे गेली. संदीपान भुमरे यांना उमेदवारी जाहीर झाली तेव्हापासून जिल्ह्यातील भाजपमध्ये (BJP) नाराजी पसरली आहे. उघडपणे ती समोर येत नसली तरी तीन वर्षांची मेहनत वाया जाणार, या नाराजीतून अनेक भाजपचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते थेट नाही पण पर्यायी मार्गाने वेगळ्या भूमिकेच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.

Devendra Fadnavis, Sandipan Bhumre, Vinod Patil
Sunetra Pawar News : माजी खासदार म्हणतात, "सूनेत्रा तू सर्वात चांगली सून आहेस!"

शिंदे यांनी नाकारल्यानंतर आज विनोद पाटील (Vinod Patil) यांनी थेट नागपूर गाठत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या दरबारात हजेरी लावल्याची माहिती आहे. महायुतीने संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतरही विनोद पाटील अपक्ष लढण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचे कळते. पाटील हे मुख्यमंत्र्यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात. संभाजीनगर दौऱ्यावर जेव्हा जेव्हा मुख्यमंत्री येतात तेव्हा या दोघांमध्ये भेट किंवा चर्चा होतेच.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दिल्लीतील लाल किल्ल्यावर दोन वर्षांपासून शिवजयंती साजरी करण्याच्या विनोद पाटील यांच्या पुढाकारातून होणाऱ्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आवर्जून हजेरी लावतात. त्यामुळे शिंदे यांनी उमेदवारी जाहीर केलेल्या भुमरे यांना अडचण होईल, अशी भूमिका ते घेणार नाहीत, अशी चर्चा होती. परंतु, नागपुरात उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाऊन पाटील यांनी आपण निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

आता फडणवीस पाटील यांची समजूत कशी काढतात? अपक्ष न लढण्याच्या बदल्यात त्यांना काही आश्वासन देतात का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. संभाजीनगरची जागा शिवसेनेकडे घेताना मुख्यमंत्री शिंदे यांना बरीच कसरत करावी लागली होती. भाजपने शेवटपर्यंत प्रयत्न केले, पण त्यात त्यांना यश आले नाही.

Devendra Fadnavis, Sandipan Bhumre, Vinod Patil
Pune Congress News : चव्हाण अन् थोरातांपुढे 'गद्दार भगाओ, काँग्रेस बचाओ'चा नारा देत बागुलांवर निशाणा

मतदारसंघ शिवसेनेला सुटल्यामुळे नाराज भाजपच्या नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदारांना विनोद पाटील यांच्या रूपात तिसरा पर्याय देण्याचा डाव तर खेळला जात नाही ना? अशी चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात सुरू आहे. विनोद पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवली तर त्याचा फटका महायुतीचे संदीपान भुमरे, महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे यांना सर्वाधिक बसणार आहे.

पाटील यांची समजून महायुतीचे नेते काढू शकले नाही, तर यावेळी अडचणीत सापडलेले एमआयएमचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांच्या आशा पुन्हा पल्लवित होऊ शकतात. पाटील-फडणवीस यांच्या भेटीचे फलित काय निघते, हे पुढील काही तासांत स्पष्ट होईल. इकडे या भेटीने महायुतीचे अधिकृत उमेदवार संदीपान भुमरे यांचे टेन्शन मात्र निश्चितच वाढणार आहे.

R

Devendra Fadnavis, Sandipan Bhumre, Vinod Patil
Solapur Politics: सोलापुरात एमआयएमचा काँग्रेसने नव्हे, तर भाजपने घेतलाय धसका

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com