Manoj Jarange Patil : एकनाथ शिंदेंवर टोकाची टीका करणाऱ्या जरांगे पाटलांचा शिवसेना नेत्याकडूनच पाहुणचार; राजकीय चर्चांना उधाण

Abdul Sattar welcomes Manoj Jarange Patil : अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघातच हा कार्यक्रम असल्याने मनोज जरांगे पाटील यांचे सिल्लोडमध्ये आगमन होताच त्यांनी जरांगे पाटील यांचे पुष्पवृष्टी करत स्वागत केले. शिवसेना भवन या आपल्या संपर्क कार्यालयात नेऊन जरांगे पाटी यांचा उचित सन्मान केला.
Manoj Jarange Patil | Abdul Sattar
Manoj Jarange Patil | Abdul SattarSarkarnama
Published on: 
Updated on: 

Chhatrapati Sambhajinagar News, 16 Nov : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांची गट्टी चांगलीच जमली आहे. अंतरवाली सराटीतून उपोषण सुरू केल्यानंतर मुंबईकडे कूच करण्यापूर्वी एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडणाऱ्या जरांगे पाटील यांची सत्तार यांनी भेट घेतली होती. एकनाथ शिंदे हे प्रामाणिक नेते आहेत, त्यांनी मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण मिळवून दिले आहे, त्यांच्या हेतूबद्दल शंका घेऊ नका, अशी विनंती सत्तारांनी तेव्हा केली होती.

एकनाथ शिंदे यांना जरांगे यांच्याकडून टार्गेट केले जात असल्यामुळे सत्तारांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला होता. परंतु जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. उलट पाचशे कोटी रुपये एकनाथ शिंदे यांनी मला देण्यासाठी भाजपकडून घेतले आणि ते खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडून मला देण्यात आले, असा दावा करणारी कथित ऑडिओ क्लीप व्हायरल करत शिवसेनेची अडचण अधिकच वाढवली होती.

अब्दुल सत्तार हे ज्या शिवसेनेचे आमदार आहेत, त्या पक्षाच्या मुख्य नेत्याला जरांगे पाटील यांना सातत्याने लक्ष्य केले जात असताना सत्तार यांची मात्र त्यांच्याशी असलेली जवळीक वाढतच आहे. आंदोलनादरम्यान, सत्तार जरांगे पाटील यांना हॉस्पीटलमध्ये जाऊनही भेटले होते. जरांगे देखील अब्दुल सत्तार यांचे नेहमी कौतुक करताना दिसतात. या पार्श्वभूमीवर काल मनोज जरांगे पाटील हे काल अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघात आले होते.

Manoj Jarange Patil | Abdul Sattar
Trupti Desai : चाकणकरांच्या फोटो अन् नावाच्या ट्रेडमार्कवर टीका सुरू असतानाच तृप्ती देसाईंचा मोठा खुलासा; म्हणाल्या, "मी 2021 मध्येच"

निमित्त होते सिल्लोड तालुक्यात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या अनावरणाचे. सत्तार यांच्या मतदारसंघातच हा कार्यक्रम असल्याने मनोज जरांगे पाटील यांचे सिल्लोडमध्ये आगमन होताच त्यांनी जरांगे पाटील यांचे पुष्पवृष्टी करत स्वागत केले. शिवसेना भवन या आपल्या संपर्क कार्यालयात नेऊन जरांगे पाटी यांचा उचित सन्मान केला. त्यानंतर रात्री चिंचपूर येथील पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमालाही सत्तारांनी जरांगे पाटील यांच्यासोबत हजेरी लावली.

या कार्यक्रमासाठी गावातील लोकांनी मोठी गर्दी केली होती. पुतळ्याचे अनावरण झाल्यानंतर जरांगे पाटील यांनी उपस्थितांसमोर छोटेखानी भाषणही केले. यावेळी सत्तार यांना व्यासपीठावर बसण्याची विनंती करण्यात आली. पण त्यांनी जरांगे पाटील यांच्या शेजारी बसण्याऐवजी लोकांमध्ये खुर्चीवर बसून त्यांचे भाषण ऐकले. जरांगे पाटील यांना मराठा समाजाने दैवत मानले आहे. अशावेळी त्यांच्या शेजारी बसण्याऐवजी लोकांमध्ये खुर्चीवर बसून आपण जरांगे पाटील यांचा सन्मानच केला, असा संदेश देण्याचा सत्तार यांचा प्रयत्न यशस्वी झाला.

Manoj Jarange Patil | Abdul Sattar
Amit Shah Pune Visit : अमित शाह पुण्यात असताना CM फडणवीस दिवसभर गैरहजर; रात्री बंद दाराआड चर्चा, नेमकी मागणी काय?

२०२४ मध्ये विधानसभा निवडणुकीत अब्दुल सत्तार यांचा विजय अगदी थोड्या मतांनी झाला. एक लाखांच्या मताधिक्याचा दावा करणाऱ्या सत्तार यांचा विजय जेमतेम २४२० मतांनी झाला. याचा धसका अब्दुल सत्तार यांनी घेतला आणि गेल्या दोन-अडीच वर्षात नव्याने मतदारसंघाची नव्याने बांधणी केली. महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून लढलेल्या सुरेश बनकर यांना मिळालेली सहानुभूती पुन्हा आपल्याकडे वळवण्याचा आणि त्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याशी वाढवलेल्या जवळीकीतून सत्तार एकप्रकारे सोशल इजिनिअरिंगच साधत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.