Amit Shah Pune visit : अमित शाह पुण्यात असताना CM फडणवीस दिवसभर गैरहजर; रात्री बंद दाराआड चर्चा, नेमकी मागणी काय?

Devendra Fadnavis Amit Shah meeting : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह दोन दिवसीय पुणे दौऱ्यावर आले आहेत. रविवारी दुपारी लोहगाव विमानतळावर त्यांचे आगमन झाले. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महापौर मंजुषा नागपुरे यांनी त्यांचे स्वागत केले.
Amit Shah | Devendra Fadnavis
Amit Shah | Devendra FadnavisSarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune News, 16 Nov : केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शाह यांच्या पुणे दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी रात्री त्यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. राज्यातील दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांना द्यावयाची मदत आणि राज्यातील अन्य महत्त्वाच्या प्रश्नांवर या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते.

दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्राला अधिक मदत द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी शाह यांच्याकडे केल्याची माहिती आहे. अमित शाह पुणे दौऱ्यावर आले असताना दिवसा मुख्यमंत्री फडणवीस यांची अनुपस्थिती राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली होती. मात्र, रविवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री फडणवीस यांनी शाह यांची भेट घेत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला.

या दोन्ही बड्या नेत्यांमध्ये बंद दाराआड प्रदीर्घ चर्चा झाली असून, राज्यातील प्रशासकीय आणि राजकीय मुद्द्यांवरती चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. ​केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह दोन दिवसीय पुणे दौऱ्यावर आले आहेत. रविवारी दुपारी लोहगाव विमानतळावर त्यांचे आगमन झाले. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, महापौर मंजुषा नागपुरे, आमदार सुनील शेळके, जयंत येरवडेकर आदी नेत्यांनी त्यांचे स्वागत केले.

Amit Shah | Devendra Fadnavis
Trupti Desai : चाकणकरांच्या फोटो अन् नावाच्या ट्रेडमार्कवर टीका सुरू असतानाच तृप्ती देसाईंचा मोठा खुलासा; म्हणाल्या, "मी 2021 मध्येच"

मात्र, त्याच वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑनलाइन उपस्थितीत गडचिरोली येथे कार्यक्रम असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिकडे रवाना झाले होते. त्यामुळे शाह यांच्या स्वागताला आणि दिवसा झालेल्या कार्यक्रमांना फडणवीस उपस्थित राहू शकले नाहीत. दिवसाच्या कार्यक्रमांना अनुपस्थित राहिलेल्या मुख्यमंत्र्यांनी रविवारी रात्री अमित शाह यांची खास भेट घेतली.

या बंद दाराआड झालेल्या बैठकीत राज्यातील विविध राजकीय आणि प्रशासकीय मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. विशेषतः महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती आणि अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिली जाणारी मदत यावर दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्र सरकारकडून राज्याला अधिक आर्थिक मदत मिळावी, अशी आग्रही मागणी अमित शाह यांच्याकडे केल्याचे समजते.

Amit Shah | Devendra Fadnavis
Omraje Nimbalkar : ओमराजे निंबाळकर अमित शहांच्या भेटीला, दुसरीकडे पुण्यात भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंच्या पोस्टरबाजीची जोरदार चर्चा!

तसेच सध्या राज्यातील महायुतीतील मित्र पक्षांमध्ये सुरू असलेल्या कुरबुरीबाबत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चा देखील आढावा शहा यांनी मुख्यमंत्र्यांकडून घेतल्याचे सांगितले जात आहे. तसेच काँग्रेस कडून महाराष्ट्रात कशा पद्धतीने आंदोलन आणि विरोध प्रदर्शन करण्यात येत आहे. सध्या राज्यात काँग्रेसची काय परिस्थिती आहे याबाबत देखील चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे.

दरम्यान, शाह आणि फडणवीस यांच्यात नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, याबाबत अधिकृत तपशील समोर आलेला नाही. मात्र, दुष्काळ आणि शेतकऱ्यांच्या मदतीचा मुद्दा केंद्रस्थानी असल्याची चर्चा आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या मागणीवर केंद्र सरकार काय भूमिका घेणार, याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.