Abdul Sattar On Manoj Jarange : 'मनोज जरांगे हे मराठा समाजाचे आयकॉन, निवडणूक लढवण्याचा त्यांना अधिकार' ; सत्तारांचं विधान!

Abdul Sattar on CM Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बोली आणि बंदुकीची गोळी सारखीच असते, असंही सत्तारांनी म्हटलं आहे.
Abdul Sattar On Manoj Jarange
Abdul Sattar On Manoj JarangeSarkarnama

Abdul Sattar and Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाचे आयकॉन आहेत. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्या नाहीतर 288 मतदारसंघात उमेदवार उभे करणार असे त्यांनी जाहीर केले आहे.

लोकशाहीमध्ये निवडणूक लढवण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, तसा तो जरांगे यांनाही असल्याचे स्पष्ट मत राज्याचे अल्पसंख्यांक विकास व पणन तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले.

हिंगोली जिल्हा दौऱ्यावर असताना माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्यातील सद्य राजकीय परिस्थितीवर तसेच विविध विषयांवर भाष्य केले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रासह मराठवाड्याच्या अनेक मतदारसंघात मनोज जरांगे(Manoj Jarange) फॅक्टर प्रभावी ठरला. कुणबी जातीच्या प्रमाणपत्र आधारे सगेसोयरे यांच्यासह मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्या, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील गेल्या आठ-दहा महिन्यांपासून आंदोलन करत आहेत.

राज्य सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिले आहे मात्र जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम असून त्यांनी 13 जुलै पर्यंत सरकारला मुदत दिली आहे. या पार्श्वभूमीवर अब्दुल सत्तार यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भात बोलताना ते मराठा समाजाचे आयकॉन असल्याचे म्हटले आहे.

तसेच त्यांना विधानसभा निवडणूक लढण्याचा अधिकार असल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला दिलेली दहा टक्के आरक्षण कोर्टातही टिकेल असा विश्वास सत्तार यांनी व्यक्त केला.

Abdul Sattar On Manoj Jarange
Sanjay Shirsat on Danve and Sattar dispute : 'सत्तार-दानवेंचं भांडण गंभीर की 'टाईमपास' हे बघावं लागेल' ; शिरसाटांनी घेतली सावध भूमिका!

मराठा आणि ओबीसी या समाजाच्या आरक्षणाचा विषय सध्या राज्यात गाजतो आहे. या आरक्षणाच्या मुद्द्यावर विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात निश्चित तोडगा निघेल, असेही सत्तार म्हणाले. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये या मागणीसाठी वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके यांचे उपोषण सुरू आहे.

त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आज सरकारचे शिष्टमंडळ पोहोचले असून त्यांच्या मागण्यांवर निश्चितच तोडगा निघेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांची बोली आणि बंदुकीची गोळी सारखीच असते, असे म्हणत सरकार ओबीसी आरक्षणाचा विषय तातडीने मार्गी लावेल असेही सत्तार यांनी सांगितले.

Abdul Sattar On Manoj Jarange
Manoj Jarange : 'मराठ्यांची मुलं गेली पण 'त्यांच्या' डोळ्यात...'; मनोज जरांगे यांनी विजय वडेट्टीवार यांना झापलं

मराठा समाजाच्या सापडलेल्या कुणबी नोंदणी रद्द करण्याची लक्ष्मण हाके यांनी मागणी केली. याकडे सत्तार यांची लक्ष वेधले असता एकनाथ शिंदे जे बोलतात ते सत्य समजून निर्णय घ्यावा, लागतो अशा शब्दात सत्तार यांनी या विषयावर भाष्य केले.

लोकसभा निवडणुकीत ज्या जागी पराभव झाला तिथे आमचं चिंतन सुरू आहे. निवडणुकीत आम्ही का पराभूत झालो याचं कारण शोधले जाईल, आमची टीम प्रत्येक लोकसभा मतदारसंघात पोहचत आहे. पुढची निवडणूक माझी धनुष्यबाण चिन्हावरच असेल, मित्र पक्षांना नाराजी असेल तर मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल, असेही सत्तार यांनी त्यांच्या शिवसेनेसोबत असलेल्या प्रासंगिक कराराबद्दल विचारले असता स्पष्ट केले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com