Abdul Sattar News: अब्दुल सत्तारांची झेडपीत सरशी, पण पंचायत समितीत भाजपनं दिला पराभवाचा धक्का

ZP Election : भाजपसोबतची युती झुगारत अब्दुल सत्तार यांनी नगरपालिके प्रमाणेच जिल्हा परिषद, पंचायत समितीतही 'एकला चलो रे' चा नारा दिला होता. या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या राजकारणात स्वतः किंगमेकरच्या भूमिकेत ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न होता.
Abdul sattar
Abdul sattar Sarkarnama
Published on
Updated on

सचिन चोबे

ZP Election Result News : सिल्लोड-सोयगाव मतदारसंघात जिल्हा परिषदेच्या 9 गण आणि 18 गणामध्ये स्वबळावर लढण्याचा शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांचा निर्णय त्यांच्यासाठी 'कही खुशी कही गम' देणारा ठरला. अंभई या एका वाढीव गटातून सत्तार यांनी आपला दुसरा मुलगा आमेर याला निवडून आणत वर्चस्व सिद्ध केले. 9 पैकी 6 जिल्हा परिषदेच्या गटात विजय मिळवत आपली ताकद दाखवली. पण पंचायत समितीच्या 18 पैकी 10 जागा जिंकत भाजपने अब्दुल सत्तारांना (Abdul Sattar) धक्का दिला. शिवसेनेला 8 जागांवर समाधान मानावे लागले.

भाजपसोबतची युती झुगारत अब्दुल सत्तार यांनी नगरपालिके प्रमाणेच जिल्हा परिषद, पंचायत समितीतही 'एकला चलो रे' चा नारा दिला होता. या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या राजकारणात स्वतः किंगमेकरच्या भूमिकेत ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मतदार संघातील 9 पैकी 6 जागा जिंकत सत्तार यांनी ताकद दाखवली असली तरी किंगमेकरचा रोल निभावण्यासाठी ते पुरेसे ठरणार नाहीये. दुसऱ्या मुलाला राजकारणात आणण्याचा त्यांचा प्रयत्न मात्र यशस्वी ठरला आहे.

तालुक्यात जिल्हा परिषदेच्या नऊ जागेच्या निकालामध्ये सहा जागेवर शिवसेनेच्या उमेदवारांचा विजय झाला तर भाजपला तीन जागांवर समाधान मानावे लागले. सर्वच जागांवर चुरशीच्या लढती झाल्या यात प्रामुख्याने अंभई गटात आमदार अब्दुल सत्तार यांचे पुत्र अब्दुल आमेर यांनी भाजपाचे त्र्यंबक गव्हाणे यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. तर घाटनांद्रा गटात जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन अर्जुन गाढे यांच्या पत्नी आशा गाढे यांनी पंचायत समितीचे माजी सभापती अशोक गरुड यांची मुलगी श्रुती गरुड यांचा पराभव केला.

केऱ्हाळा गटात सिद्धेश्वर कारखान्याचे चेअरमन ज्ञानेश्वर मोठे यांच्या पत्नी अनिता मोठे यांनी अटीतटीच्या लढतीमध्ये शिवसेनेच्या उमेदवार डॉ. विजया जाधव यांचा पराभव केला. अंधारी गटात जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे यांच्या पत्नी मंगला तायडे यांनी पंचायत समितीचे माजी सभापती ज्ञानेश्वर तायडे यांच्या पत्नी भाजपच्या उमेदवार महानंदा तायडे यांचा पराभव केला.

Abdul sattar
Parbhani ZP News: राजेश विटेकरांच्या भावाचा मताधिक्याचा 'रेकाॅर्ड'; पण अजित पवारांचं स्वप्न राहिलं अपूर्णच!

डोंगरगाव गटात माजीमंत्री दिवंगत माणिकराव पालोदकर यांचे पुत्र देविदास पालोदकर यांनी भाजपचे उमेदवार मच्छिंद्र पालोदकर यांचा पराभव केला. भराडी गटात भाजपाचे उमेदवार राधाकृष्ण काकडे यांनी शिवसेनेचे उमेदवार गणेश पाटील यांचा पराभव केला. तर अजिंठा गटात शिवसेनेच्या आयेशा बेगम सय्यद नासेर हुसैन यांनी भाजपच्या अलका चौंडिये यांचा पराभव केला. शिवना गटात शिवसेनेच्या निकिता काळे यांनी भाजपच्या बेबीताई काळे यांचा पराभव केला.

बनकरांकडून सत्तारांना पुन्हा दणका..

सिल्लोड पंचायत समितीवर भाजपाचे कमळ फुलले आहे. पंचायत समितीच्या 18 जागांपैकी 10 जागांवर भाजपाचे उमेदवार विजयी झाले. तर 8 जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत. पंचायत समितीच्या चुरशीच्या झालेल्या लढतीमध्ये भाजपाने हळदा, पानवडोद बुद्रुक, उंडणगाव, हट्टी, केळगाव, भराडी, धानोरा, पालोद, केऱ्हाळा व निल्लोड गणात विजय मिळविला.

Abdul sattar
Sangli Khanapur ZP: आमदारकीची पहिलीच टर्म, त्यात फडणवीसांचा एकेरी उल्लेख; शिंदेंच्या पठ्ठ्यानं भाजपचा धुव्वा उडवत मारलं मैदान

तर शिवसेनेचे अजिंठा, शिवणा, अंभई, घाटनांद्रा, आमठाणा, डोंगरगाव, अंधारी व बोरगाव सारवणी गणातील उमेदवार विजयी झाले. पंचायत समितीची सत्ता भाजपने ताब्यात घेतली. पंचायत समितीचे सभापतीपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असल्याने येथे उंडणगांव गणातून विजयी झालेल्या अनिता बनकर यांची वर्णी लागू शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com