Abhijit Dipke : सरकार लाईनवर आले नाही, तर उद्या तेही बदलू; छत्रपती संभाजीनगरमधून अभिजीत दिपकेंचा इशारा!

Abhijit Dipke speech News : सरकारने सुधारावं, विद्यार्थ्यांनी आता फक्त धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला आहे, जर हे सरकार जर लाईनवर आले नाही तर विद्यार्थी उद्या सरकारही बदलतील, असा थेट इशारा दिपके यांनी दिला आहे.
Abhijeet Dipke, Bhagwanrao Dipke, Anita Dipke,
Abhijeet Dipke, Bhagwanrao Dipke, Anita Dipke,Sarkarnama
Published on
Updated on

Chattrapati Sambhajinagar : दिल्लीच्या जंतरमंतरवरील आंदोलन यशस्वी झाले असले तरी देशाच्या विविध राज्यांमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू झाले आहे. हे आंदोलनही दडपण्याचा प्रयत्न सरकारकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी छत्रपती संभाजीनगरमधून सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे.

सरकारने विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करून त्यांचे रक्त वाहिले आहे. विद्यार्थ्यांना आता पुन्हा त्रास आणि धमक्या दिल्या जात आहेत. सरकारने सुधारावं, विद्यार्थ्यांनी आता फक्त धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला आहे, जर हे सरकार जर लाईनवर आले नाही तर विद्यार्थी उद्या सरकारही बदलतील, असा थेट इशारा दिपके यांनी दिला आहे.

Abhijeet Dipke, Bhagwanrao Dipke, Anita Dipke,
Maharashtra Live Politics Update : 'सरकारच्या हातात बंदुका- लाठी असेल, पण आमच्या हातात तिरंगा...'; उद्धव ठाकरे

दिल्लीतील आंदोलन यशस्वी झाल्यानंतर चाळीस दिवसांनी अभिजीत दिपके आज आपल्या राहत्या घरी म्हणजेच छत्रपती संभाजीनगरमध्ये परतले. विमानतळावर शेकडो समर्थक आणि आई-वडीलांची भेट घेतल्यानंतर अभिजीत यांनी माध्यमांशी संवाद साधला.

क्रांती चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कमानीजवळ जाऊन बाबासाहेबांना अभिवादन केले. 36 दिवसांनंतर विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश आले याचा आनंद होत आहे. सरकारने आता तरी सुधारावे. 20 जुलै रोजी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला आणि रस्त्यावर विद्यार्थ्यांचे रक्त सांडले.

एवढे रक्त वाहूनही सरकारचे मन भरले नाही. आता वेगवेगळ्या राज्यातील विद्यार्थ्यांना कारवाईची धमकी दिली जात आहे. पोलीस घरी जाऊन विद्यार्थ्यांना त्रास देत आहेत, हे विद्यार्थी देशाचे भविष्य आहेत. सरकारला असेच काम करायचे असेल विद्यार्थ्यांनी आता फक्त धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतला आहे, सरकार लाईनवर आले नाही तर उद्या सरकारही बदलतील, असे दिपके म्हणाले.

Abhijeet Dipke, Bhagwanrao Dipke, Anita Dipke,
Maharashtra News Live Update : गिरीश महाजन यांच्या बदनामी प्रकरणी पुणे जिल्ह्यातून एकाला अटक

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com