Dr. Shrikant Shinde
Dr. Shrikant ShindeSarkarnama

Shivsena Group News : एकनाथ शिंदे हे `नायक` सिनेमातील मुख्यमंत्र्यांसारखेच लोकप्रिय!

एकनाथ शिंदे यांचे स्थान अनिल कपुरच्या `नायक` सिनेमातील मुख्यमंत्र्यांप्रमाणे लोकांच्या मनात आहे.

Eknath Shinde is became hero in public : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कामाचा झपाटा पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळु सरकायला लागली आहे. त्यामुळे विरोधक सभांमध्ये फक्त शिव्याशाप देत आहेत. ते जागेपणी आणि झोपेतील स्वप्नांत देखील फक्त खोके अन् खंजीर एव्हढेच बोलतात असा आरोप खासदार श्रीकांत शिंदे यांनी केला. (Eknath Shinde Group`s Shivsena Nashik office inaugurated by Dr. Shrikant Shinde)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाच्या शिवसेनेच्या (Shivsena) कार्यालयाचे आज खासदार श्रीकांत शिंदे (Dr. Shrikant Shinde) यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. मायको सर्कल चौकात हायटेक पध्दतीने उभारलेल्या कार्यालयाच्या उध्दाटनाला ग्रामीण भागातील मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Dr. Shrikant Shinde
Chhatrapati Sanyogitaraje Issue : अवमान करणारा पुजारी सुधीरदास वादग्रस्तच!

यावेळी श्रीकांत शिंदे, खासदार हेमंत गोडसे, पालकमंत्री दादा भुसे, आमदार सुहास कांदे, संपर्कनेते भाऊसाहेब चौधरी, जिल्हाध्यक्ष अजय बोरस्ते, शहराध्यक्ष प्रविण तिदमे, सह संर्पकप्रमुख राजू लवटे, बळीराम (मामा) ठाकरे आदीसह मोठ्या संख्येने पदाधिकारी होते.

कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मायको सर्कल चौकालगतची ही इमारत सजविण्यात आली होती. भगवे ध्वज, नाशिक ढोलचा गजर अशा वातावरणात उद्घाटन झाले. श्री शिंदे यांनी प्रतिमापूजन केले. तसेच कार्यालयाची पाहणी केली. यावेळी धनुष्यबाण देउन श्री शिंदे यांचा सत्कार झाला. नाशिक ढोल पथकाची प्रात्याक्षिके झाली.

Dr. Shrikant Shinde
Pimpalgaon APMC election news : दिलीप बनकर आणि अनिल कदम राजकारण तापले!

यावेळी खासदार शिंदे म्‍हणाले की, विरोधकांना मतदारांची सहानुभूती मिळवायची असेल, त्यांच्यावर अन्याय झाला हे लोकांना पटवून द्यायचे असेल तर आधी अडीच वर्षाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाचा लेखाजोखा सादर करावा. गद्दार, खोके, खंजीर अन् कोथळा ही स्क्रीप्ट पुन्हा पुन्हा ऐकून जनतेलाही कंटाळा आला आहे.

ते पुढे म्हणाले, विरोधकांना सध्या फक्त खोकेच माहीत आहेत. त्यामुळे ते दिवसरात्र खोक्यांविषयीच बोलतात. गद्दार आम्ही नसून ते आहेत, कारण त्यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी गद्दारी केली. आम्ही सर्व खरी शिवसेना आहेत. शिवसेनेच्या मार्गावर वाटचाल करीत आहोत.

Dr. Shrikant Shinde
Jitendra Awhad News : संविधानाची प्रत हाती घेऊन केला काळाराम मंदिरात प्रवेश!

यावेळी पालकमंत्री दादा भुसे म्हणाले, रोजगार निर्मिती अन् कुंभमेळ्याच्या तयारीचा आराखडा तयार आहे. त्यातून विशेष पॅकेज नाशिकला मिळणार आहे. सामान्य माणुस आणि शेतकरी हा यंदाच्या अर्थसंकल्पाच्या केंद्रस्थानी असून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सुट देण्याची घोषणा अडीच वर्षापूर्वी झाली. मात्र प्रामाणिक शेतकऱ्यांच्या खात्यावर अडीच हजार कोटी देण्याचे काम शिंदे सरकारने केले.

शेतकऱ्यांच्या कांद्याला साडे तीनशे अनुदान राज्य सरकारने दिले. ठाणे जिल्ह्यानंतर एकनाथ शिंदे यांचे प्रेम नाशिकवर आहे. ज्याप्रमाणे कल्याण डोंबिवली, ठाणे, मुंबई बदलतेय त्याप्रमाणे नाशिक बदलणार आहे. असा दावा त्यांनी केला.

Dr. Shrikant Shinde
Nashik News : निधीसाठी जिल्हा परिषद दोनपर्यंत जागली!

आमदार सुहास कांदे यांनी कार्यकर्त्यांना गावागावात शिवसेनेच्या शाखा उघडण्याचे आवाहन केले. अभिनेता अनिल कपूर यांच्या `नायक` चित्रपटात एक दिवसात मुख्यमंत्री काय करतो हे दाखविले गेले. पण राज्यात मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कारकिर्दीत तसा रोजच कामांचा धडाका सुरु आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com