Mla Sanjay Shirsat-Chandrakant Khaire News
Mla Sanjay Shirsat-Chandrakant Khaire NewsSarkarnama

Chandrakant Khaire On Shirsat News : शिरसाटांनी वर खोके दिले नाही, म्हणून त्यांना मंत्रीपद मिळाले नाही का ?

Chhatrapati Sambhajinagar : ठाकरेंवर आरोप करत आहात, तुम्हाला माहित असेल तर तुम्हीच सांगा ना.
Published on

Shivsena : राज्यातील सत्तांतरानंतर खोक्यांची चर्चा राजकारणात मोठ्या चवीने केली जाते. विरोधकांनी सत्ताधारी पक्षातील विशेषतः शिंदेसोबत गेलेल्या आमदार आणि मंत्र्यांवर गद्दारीसाठी ५० खोके घेतल्याचा आरोप करत अक्षरशः भांडावून सोडले आहे. (Shivsena) यावरून अनेकदा शिंदे आणि ठाकरे गटात खटकेही उडाले.

Mla Sanjay Shirsat-Chandrakant Khaire News
Imtiaz Jalil News : ना जयंती, ना पुण्यतिथी, मग `सावरकर गौरव` यात्रा आजच का ?

खोके घेतल्याचा आरोप जिव्हारी लागत असल्याने शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री आता विरोधकांनाही जशासतसे उत्तर देवू लागले आहेत. (Sanjay Shirsat) आमदार संजय शिरसाट यात आघाडीवर आहेत. (Chandrakant Khaire) छत्रपती संभाजीनगरमध्ये होत असलेल्या महाविकास आघाडीच्या `वज्रमुठ`, सभेच्या पार्श्वभूमीवर शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

अपक्ष शंकरराव गडाख यांच्यासह अन्य दोन आमदारांना महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री करतांना किती खोके घेतले हे उद्धव ठाकरेंनी आजच्या जाहीर सभेतून सांगावे, असे आव्हान दिले आहे. त्याला ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

कोण संजय शिरसाट? असे म्हणत तुम्हाला मिळालेल्या ५० खोक्यामधले काही खोके तुम्ही वर दिले नाही, म्हणून तुम्हाला मंत्रीपद मिळाले नाही का? असा टोला लगावला आहे. ठाकरेंवर आरोप करत आहात, तुम्हाला माहित असेल तर तुम्हीच सांगा ना, असे प्रतिआव्हान देखील खैरे यांनी शिरसाटांना दिले आहे. आता या दोन नेत्यांमधील कलगितुरा सुरू असतांना उद्धव ठाकरे आपल्या भाषणातून शिरसाटांच्या आरोपांना उत्तर देतात का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com