Pahalgam Attack : एक दिवस आधी दावा अन् आज NIA, ATS दारात; पहलगाम हल्ल्यावरून जालन्यातील तरूणाची दीड तास चौकशी

Jalna Tourist Adarsh Raut : पहलगाम हल्ल्यानंतर देशातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली असून एनआयएने तपास गतीने वाढवला आहे. महाराष्ट्रातील एका पर्यटकाने संशयित हल्लेखोरांची रेखाचित्रे त्याच्याशी चौकशी करणाऱ्यांशी मिळतीजुळती असल्याचा दावा केला होता.
Pahalgam Attack
Pahalgam Attacksarkarnama
Published on
Updated on

Jalna News : पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्याला आता एक आठवडा होत असून अनेक नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. दरम्यान एनआयएने संशयित हल्लेखोरांची रेखाचित्रे जारी केल्यानंतर जालन्यातील एका पर्यटकाने केलेल्या दाव्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. तर त्याच्या या दाव्यानंतर आज (ता.1) एटीएस आणि स्थानिक तपास यंत्रणा थेट जालन्यात पोहचल्याने राज्यात खळबळ उडाली होती. जालन्यातील आदर्श राऊत यांनी त्यांना पहलगाममध्ये फिरत असतानाही हल्ल्याच्या एक दिवस आधी 'तू काश्मीरी आहे का? हिंदू आहे का?' अशी विचारणा केली होती, असा दावा त्यांनी केला होता.

जालन्यातील आदर्श राऊत नावाचा युवक आपल्या कुटुंबासोबत काश्मीर फिरायला गेला होता. यावेळी पहलगाममध्ये त्याला काही लोकांनी हटकताना तो काश्मीरी आहे का? हिंदू आहे का? अशी चौकशी केली होती. तर आज गर्दी कमी असून उद्या पुन्हा येऊ, अशी त्यांच्यात चर्चा झाली होती. तर ते दुसरे तिसरे कोण नसून एनआयएने जारी केलेल्या संशयित हल्लेखोरांची रेखाचित्रातील मिळत्याजुळत्या व्यक्ती होत्या असा दावा आदर्शने केला होता. तसेच त्याने याबाबत एनआयएला ई-मेल करून माहिती आणि मॅगी स्टॉलचा फोन नंबर दिला होता.

यानंतर बुधवारी (ता.1) NIA, एटीएस आणि स्थानिक तपास यंत्रणांनी आदर्श राऊत याच्या घरी जाऊन चौकशी केली. NIA, ATS कडून आदर्श राऊत यांची कसून चौकशी करताना दहशतवाद्याशी काय संभाषण झाले? मॅगी स्टॉलचा फोन नंबर? पैशांचे ट्रांजेक्शन? याची माहिती घेतली. सध्या संपूर्ण तपास यंत्रणा सतर्क झाली असून हल्ल्याशी संबंधित काही धागेद्वारे मिळतात का? याचाही तपास आता NIA, ATS करत आहे.

Pahalgam Attack
Pahalgam Terror Attack : अमोल कोल्हेंनी थेट सुनावलं, '...तर आपण अतिरेक्यांच्या भूमिकेला खतपाणी घालत नाही ना?'

दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी, प्रत्येत दहशतवादी कृत्याला जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार असून त्यांना वेचून शिक्षा दिली जाईल, असे मोठे विधान केले. त्यांनी हे वक्तव्य पहलगाम येथे घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर केले आहे.

Pahalgam Attack
Sanjay Raut On Pahalgam Attack : ' 27 जणांचा मृत्यू हे सरकारने घेतलेले नरबळी आहेत', संजय राऊत संतापले

जर कोणाला असा भ्याड हल्ला करून हा त्यांचा विजय झाल्याचे वाटतं असेल तर त्यांनी इकडे लक्ष द्यावे. आम्ही एकेक अतिरेक्याला वेचून हल्ल्याचा सूड घेऊ. दहशतवादाच्या विरोधात लढण्यासाठी भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक देशांचा पाठिंबा मिळत असून भारताच्या इंच आणि इंच जमिनीवरून दहशतवाद मुळासकट उखडून फेकू असेही अमित शाह यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com