Aditya Thackeray: मराठवाड्याच्या प्रश्नावर आदित्य ठाकरे आक्रमक! मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलखोल करणार

Aditya Thackeray on Marathwada Development Projects: मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त 2023 मध्ये घेतलेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील आश्वासनांची चिरफाड आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत केली जाणार आहे.
Aditya Thackeray on Marathwada Development Projects
Aditya Thackeray on Marathwada Development ProjectsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada politics: मराठवाडा हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. राज्यात अनेक सरकार आले आणि गेली, परंतु मराठवाड्याच्या विकासाचा अनुशेष कधी भरून निघालाच नाही. 17 सप्टेंबर हा मराठवाडा मुक्ती दिन म्हणून ओळखला जातो. निजामाच्या जोखडातून मुक्त झालेला हा प्रदेश अजूनही गुलामगिरीतच आहे की काय? अशी परिस्थिती या भागातील रखडलेल्या विकास कामावरून दिसून येते.

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी ध्वजारोहण करण्यासाठी अख्खे मंत्रिमंडळ संभाजीनगरमध्ये दोन दिवस तळ ठोकून बैठक घेते. कोट्यावधी रुपयांच्या विकास कामांच्या घोषणा केल्या जातात. त्यानंतर पुन्हा पुढच्या वर्षीच मंत्रिमंडळाचे पाय संभाजीनगरात लागतात. घोषणांचे पुढे काहीच होत नाही ही परिस्थिती गेल्या अनेक वर्षांपासून कायम आहे.

याच परिस्थितीवर भाष्य करत सरकारची पोलखोल करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा नेते आमदार आदित्य ठाकरे संभाजीनगरात येत आहेत. 'डेव्हलपमेंट डिलीट डेव्हलपमेंट डिनाईड'या घोषवाक्यसह आदित्य ठाकरे 3 सप्टेंबर रोजी मराठवाड्यातील रखडलेल्या विकासकामाचे सादरीकरण करणार आहेत. मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त 2023 मध्ये घेतलेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील आश्वासनांची चिरफाड आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत केली जाणार आहे.

17 सप्टेंबर रोजी दरवर्षी मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त ध्वजारोहणासाठी मुख्यमंत्री मराठवाड्यात येतात हैदराबाद मुक्तिसंग्राम लढ्यातील सैनिकांना तेव्हा आदरांजली वाहिली जाते या कार्यक्रमाच्या निमित्ताने मराठवाड्यात मंत्रिमंडळ बैठक घेण्यात येईल अशी मागणी केली जाते अलीकडच्या काळात अशा दोन मंत्रिमंडळाच्या बैठका घेण्यात आल्या होत्या या बैठकांमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयांची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी केलेल्या पत्रव्यवहारातून केला होता.

विभागीय आयुक्त जी श्रीकांत आणि शिवसेना नेते आमदार अंबादास दानवे यांच्या उपस्थितीमध्ये घोषणांचा आढावा घेण्यात आला होता अनेक सिंचनाचे प्रकल्प केवळ कागदावर असून त्यांची काम पूर्ण झालेली नाहीत. 16 सप्टेंबर 2023 मध्ये मराठवाड्याच्या विकासासाठी घेण्यात आलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत 44000579 कोटी रुपयांच्या घोषणा करण्यात आल्या होत्या यामध्ये सर्वाधिक तरतूद जलसंपदा विभागासाठी करण्यात आली होती 21 हजार 580 कोटी 24 लाख रुपयांची कामे यात प्रस्तावित होती तर सार्वजनिक बांधकाम विभागाला 12 हजार 938 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते.

मराठवाड्यातील निजामकालीन शाळांच्या दुरुस्तीसाठी लोकसहभागाची अट वगळून 200 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते यातील अनेक कामे झालीच नाहीत काही कामांचे कागदी घोडे नाचवणे सुरू आहे अनेक योजना पूर्णत्वास येत नसल्याने मराठवाड्याच्या विकासाची संथगती कायम आहे यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने बोट ठेवत छत्रपती संभाजी नगर मध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

जलसंपदा शिक्षण आरोग्य आणि पाणीपुरवठ्याच्या अनेक योजना मंजूर होऊनही कामच होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर मंत्रिमंडळ निर्णयाची चिकित्सा शिवसेनेकडून केली जाणार आहे हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी विविध पातळ्यांवर माहिती एकत्र केली जात आहे त्याचे सादरीकरण आदित्य ठाकरे 3 सप्टेंबर रोजी करणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com