Aditya Thackeray News : पैठणमध्ये आदित्य ठाकरेंना मराठा आंदोलकांनी रोखले..

Aditya Thackeray's visit to Sambhajinagar in controversy, Maratha protesters blocked in Paithan : नुकतेच धाराशिव दौऱ्यावर आलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही मराठा आंदोलकांच्या आक्रमक पावित्र्याला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर पैठणमध्ये आदित्य ठाकरे यांनाही मराठा आंदोलकांनी जाब विचारत संताप व्यक्त केला.
Aditya Thackeray
Aditya ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Aditya Thackeray Tour Political News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांचा दोन दिवसीय संभाजीनगर दौरा चांगलाच वादात सापडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात महाविकास आघाडीने आंदोलन केल्यानंतर भाजपने आदित्य ठाकरे थांबलेल्या हॉटेल समोर जाऊन राडा केला. त्यानंतर आज दुपारी पैठण दौऱ्यावर असलेल्या आदित्य ठाकरे यांना मराठा आंदोलकांच्या रोशाला सामोरे जावे लागले.

पैठण मध्ये असताना मराठा आंदोलकांनी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचा ताफा अडवत मराठा आरक्षणा संदर्भात भूमिका स्पष्ट करा, अशी मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली. एक मराठा लाख मराठा, अशा घोषणा देत आक्रमक झालेल्या आंदोलकांना आदित्य ठाकरे यांनी `आम्ही तुमच्या सोबत आहोत`, असा विश्वास देत आंदोलकांचे निवेदन स्वीकारले. यावेळी मोठा जमाव जमल्याने वातावरण तापले होते.

मात्र संभाजीनगर मध्ये भाजपने केलेल्या आंदोलनानंतर आदित्य ठाकरे यांच्या जिल्हा दौऱ्यात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. त्यामुळे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी आदित्य ठाकरे यांच्या ताफ्याला मराठा आंदोलकांच्या गर्दीतून वाट करून देत त्यांना मार्गस्थ केले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात व मराठवाड्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीला राजकीय लाभ झाला होता.

Aditya Thackeray
Shivsena-BJP News : मोदींविरोधातील आंदोलनाचा राग भाजपने काढलाच..

मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ वगळता सातही लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले. (Shivsena) यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे हिंगोली, परभणी आणि धाराशिव मधील खासदारांचा समावेश आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील महायुती सरकार विरोधात असलेला रोष लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडला होता.

मात्र मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत महाविकास आघाडीचे नेते गेले नाही, याचा राग मराठा समाजामध्ये आहे. नुकतेच धाराशिव दौऱ्यावर आलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही मराठा आंदोलकांच्या आक्रमक पावित्र्याला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर पैठणमध्ये आदित्य ठाकरे यांनाही मराठा आंदोलकांनी जाब विचारत संताप व्यक्त केला.

Aditya Thackeray
Maratha Reservation: मराठा आंदोलकांनी नाना पटोले यांची गाडी अडवली, घोषणा देत प्रश्नांची सरबत्ती!

पैठण विधानसभा मतदारसंघांमध्ये आदित्य ठाकरे महाराष्ट्र स्वाभिमान सभा घेण्यासाठी आले होते. या मतदारसंघातून पाच वेळा विधानसभेवर निवडून गेलेले संदिपान भुमरे हे आता छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भुमरे यांचे चिरंजीव विलास बापू भुमरे हे पैठण मधून महायुतीचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. संदिपान भुमरे यांनी केलेल्या गद्दारीचा बदला घेण्यासाठी ठाकरे गटाने पैठणमध्ये भुमरे यांच्या विरोधात जोर लावला आहे.

आजच्या स्वाभिमान सभेच्या माध्यमातून वातावरण निर्मिती करण्याचा ठाकरे गटाचा प्रयत्न होता. मात्र सकाळी संभाजीनगरात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनामुळे वातावरण तापले होते. त्यातच आता पैठणमध्ये मराठा आंदोलकांनी आदित्य ठाकरे यांना विरोध केल्यामुळे वाद अधिकच वाढला आहे. आज सायंकाळपर्यंत आदित्य ठाकरे संभाजीनगर जिल्ह्यातील आपला दौरा आटोपून मुंबईला रवाना होणार आहेत. एकूणच आदित्य ठाकरे यांचा संभाजीनगर दौरा चांगलाच वादात सापडला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com