

इचलकरंजीत आंबेडकर जयंतीदरम्यान धक्काबुक्कीचे रूपांतर हाणामारीत झाले.
या घटनेत बंदोबस्तावर असलेले पोलिस गंभीर जखमी झाले.
अनेक आरोपींविरोधात पोलिसांवर हल्ला व सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ichalkaranji News : इचलकरंजी शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त स्टेशन रोडवरील पुतळा परिसरात गर्दी उसळली असताना किरकोळ धक्काबुक्कीचे रूपांतर हाणामारीत झाले. यात बंदोबस्तावरील पोलिस सद्दामहुसेन गजबरसाब सनदी यांना धक्काबुक्की केल्याने ते गंभीर जखमी झाले.
याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात कृष्णा श्रावण कटारे, अमोल श्रावण कटारे, सिद्धार्थ नागेश विधाते, सूरज नागेश विधाते, ओंकार विधाते, साहील प्रदीप देठे, आनंदा लक्ष्मण साठे, बादल परिस दौडमनी, (सर्व रा. इचलकरंजी) व इतर अनोळखी ५ ते ६ जणांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, पोलिसांवर हल्ला व दुखापत करणे, अशा गुन्ह्यांची नोंद केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता. १३) रात्रीपासूनच जयंतीनिमित्त पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. मध्यरात्रीनंतर अनुयायी मोठ्या संख्येने अभिवादनासाठी जमले होते. गर्दीत धक्काबुक्की सुरू झाली आणि दोन गट आमने-सामने आले. बंदोबस्तावरील कॉन्स्टेबल सद्दाम सनदी व होमगार्ड यांनी हस्तक्षेप केला.
मात्र, जमाव आक्रमक झाल्याने भांडण अधिकच चिघळले. याचवेळी संशयित अमोल कटारे याने कॉन्स्टेबल सनदी यांच्या डोक्यात दगड मारून त्यांना जखमी केले. इतर पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत दोन्ही गटांना पांगवले व परिस्थिती नियंत्रणात आणली.
पोलिसांवर हल्ला हा पूर्वनियोजित असल्याचा संशय व्यक्त होत आहे. प्राथमिक तपासात संशयितांना यापूर्वी चोरीच्या गंभीर गुन्ह्यांप्रकरणी चौकशीसाठी ठाण्यात बोलावले होते. याचाच राग मनात धरून संबंधित आरोपीने संधी साधत पोलिस कर्मचाऱ्यावर दगडाने हल्ला केल्याची माहिती पुढे आली आहे.
किरकोळ धक्काबुकी सुरू असतानाच अचानक दगडफेक करण्यात आल्याने हा प्रकार अचानक नसून, हेतुपुरस्सर घडवून आणल्याचा पोलिसांचा ठाम संशय आहे. त्यामुळे पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत तपास सुरू केला आहे.
1. घटना कुठे घडली?
इचलकरंजी शहरातील स्टेशन रोडवरील पुतळा परिसरात ही घटना घडली.
2. घटनेत कोण जखमी झाले?
बंदोबस्तावर असलेले पोलिस सद्दामहुसेन सनदी हे गंभीर जखमी झाले.
3. हाणामारीचे कारण काय होते?
किरकोळ धक्काबुक्कीचे रूपांतर वादात होऊन हाणामारी झाली.
4. किती जणांवर गुन्हा दाखल झाला आहे?
काही ओळख पटलेल्या आरोपींसह 5 ते 6 अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल आहे.
5. कोणत्या कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे?
सरकारी कामात अडथळा, पोलिसांवर हल्ला आणि दुखापत करणे अशा गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.