Congress : भारत जोडोनंतर काॅंग्रेस रस्त्यावर ; खड्ड्यांच्या विरोधात गांधीगिरी करत आंदोलन

Aurangabad : चांगले यश मिळावे ही अपेक्षा ठेवून काॅंग्रेस कामाला लागल्याचे चित्र या निमित्ताने पहायला मिळाले.
Congress protest News, Aurangabad
Congress protest News, AurangabadSarkarnama

Aurangabad News : जिल्ह्यात एकही आमदार, खासदार नसलेला काॅंग्रेस पक्ष राहूल गांधींच्या भारत जोडो यात्रेनंतर काहीसा कामाला लागल्याचे चित्र आहे. Congress भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रात जोरदार प्रतिसाद मिळाला. नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात राज्यभरातील काॅंग्रेसचे पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते भारत जोडोत सहभागी झाले होते. त्यानंतर सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करतांना काॅंग्रेस दिसत आहे.

Congress protest News, Aurangabad
Aurangabad : विद्यापीठ सिनेट निवडणुकीत राष्ट्रवादीचे एकहाती वर्चस्व ; १८ पैकी १५ जागा जिंकल्या..

शहरात कोट्यावधी रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या रस्त्यांची दुरावस्था आणि त्यावर पडलेल्या खड्ड्यांच्या विरोधात काॅंग्रेस (Congress) कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. रस्त्यावरील या खड्यांमध्ये गुलाबाच्या पाकळ्या टाकत गांधीगिरी करणाऱ्या काॅंग्रेस कार्यकर्त्यांना पाहून नागरिकांना देखील आश्चर्य वाटले. (Aurangabad) गेली कित्येक वर्ष रस्त्यावर न दिसणारा काॅंग्रेस पक्ष आता चक्क आंदोलन करत आहे हेही नसे थोडके, अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

शहरात कोट्यवधी रुपये खर्च करून रस्त्‍यांची कामे करण्यात आली असली तरी अंतर्गत रस्त्यांची वाट लागलेली आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. खड्डयांमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाकडे महापालिकेचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी (ता. १३) कॉंग्रेसतर्फे गांधीगिरी करण्यात आली. बळिराम पाटील शाळेजवळील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात गुलाब पाकळ्या टाकण्यात आल्या.

शहरातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. खड्ड्यांमुळे बैलगाडी सुद्धा चालवू शकत नाही, अशी अवस्था आहे. त्यामुळे महापालिकेचे प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांचे लक्ष वेधण्यासाठी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात गुलाबाचे फूल टाकून गांधीगिरी करण्यात आली. शहराध्यक्ष शेख युसूफ लिडर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

गेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात काॅंग्रेसची पाटी कोरी राहिली. जिल्हा परिषद, महापालिकेत देखील काॅंग्ेस सदस्यांची संख्या बोटावर मोजण्याइतकीच होती. येणाऱ्या निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळावे ही अपेक्षा ठेवून काॅंग्रेस कामाला लागल्याचे चित्र या निमित्ताने पहायला मिळाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com