Sandipan Bhumre News : लोकसभेची लिफ्ट मिळाल्यानंतर आता संदीपान भुमरेंकडून मुलाच्या आमदारकीसाठी फिल्डिंग?

Vilas Bhumre Paithan Vidhan sabha Constituency : विधानसभेसाठी पैठणमधून मुलासाठी उमेदवारीचा शब्द घेतल्यावरच भुमरे यांनी लोकसभा लढवण्यास होकार दर्शवला होता, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
Sandipan Bhumre News : लोकसभेची लिफ्ट मिळाल्यानंतर आता संदीपान भुमरेंकडून मुलाच्या आमदारकीसाठी फिल्डिंग?
Sarkarnama

Shivsena and Paithan Vidhan sabha Constituency : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे यांना लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर मतदारसंघामधून संसदेत पोहचण्याची लिफ्ट मिळाली.

पैठण विधानसभा मतदारसंघातून पाच वेळा निवडून आल्यानंतर शिवसेनेने भुमरे यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. मात्र विधानसभेसाठी पैठणमधून मुलासाठी उमेदवारीचा शब्द घेतल्यावरच भुमरे यांनी लोकसभा लढवण्यास होकार दर्शवल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

संदीपान भुमरे(Sandipan Bhumre) यांचे चिरंजीव विलास भुमरे हे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राजकारणात सक्रीय आहेत. जिल्हा परिषदेमध्ये बांधकाम सभापती म्हणून त्यांनी काम पाहिले होते. याशिवाय संदीपान भुमरे यांच्या पैठण विधानसभा मतदारसंघातील बरीच जबादारी विलास भुमरे यांनी हाती घेतली होती. महाविकास आघाडी सरकार आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमध्ये संदीपान भुमरे रोजगार हमी योजना व फलोत्पादन खात्याचे मंत्री होते.

Sandipan Bhumre News : लोकसभेची लिफ्ट मिळाल्यानंतर आता संदीपान भुमरेंकडून मुलाच्या आमदारकीसाठी फिल्डिंग?
Sandipan Bhumre Meet Manoj Jarange : संदीपान भुमरेंनी घेतली जरांगेंची भेट; पाऊण तासाच्या प्रतीक्षेनंतर झाली काही मिनिटांची चर्चा!

शिवाय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून भुमरे यांच्याकडे जेव्हा पदभार आला तेव्हापासून विलास भुमरे(Vilas Bhumre) यांनी जिल्ह्याच्या राजकारणात अधिक लक्ष घालायला सुरूवात केली होती. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण निवडणूक यंत्रणा राबवण्यात आणि वडिलांना निवडून आणण्यात विलास भुमरे यांनी महत्वाची भूमिका बजावली होती.

संदीपान भुमरे खासदार म्हणून दिल्लीत गेल्यानंतर पैठण विधानसभा मतदारसंघासाठी विलास भुमरे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त पैठण आणि संभाजीनगरमध्ये लागलेल्या शुभेच्छा बॅनरवर भावी आमदार असा विलास भुमरे यांचा उल्लेख करण्यात आला आहे. पैठण विधानसभा मतदारसंघावर संदीपान भुमरे यांची मजबुत पकड आहे. या मतदारसंघातून त्यांनी सहावेळा निवडणूक लढवली.

Sandipan Bhumre News : लोकसभेची लिफ्ट मिळाल्यानंतर आता संदीपान भुमरेंकडून मुलाच्या आमदारकीसाठी फिल्डिंग?
Shivsena UBT : संभाजीनगरात ठाकरे गटाला लागलेली गळती नेते गांभीर्याने घेणार का?

2009 मध्ये राष्ट्रवादीचे संजय वाघचौरे(Sanjay Waghchore) यांनी भुमरे यांचा पराभव केला होता. हा अपवाद वगळला तर पाच वेळा भुमरे यांनी या मतदारसंघातून विजय मिळवला आहे. याशिवाय तालुक्यातील स्थानिक स्वराज संस्थामध्येही भुमरे यांचेच वर्चस्व राहिले आहे. या शिवाय रेणूका सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून भुमरे पिता-पुत्रांनी सहकार क्षेत्रातही धडक दिली आहे.

मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात महायुतीला भुमरे यांच्या रुपाने एकमेव विजय मिळाला. त्यामुळे विधानसभेला पैठणमधून मुलासाठी उमेदवारी मागताना खासदार भुमरे यांची दावेदारी महत्वाची मानली जाणार आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीने काही मतदारंसघामध्ये अदलाबदल केली होती. विधानसभेच्या जागा वाटपात असे बदल मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशावेळी संदीपान भुमरे मुलासाठी मतदारसंघ सोडवून घेण्यात यशस्वी ठरतात का? यावर भावी आमदारांचे स्वप्न अवलंबून असणार आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com