

Osmanabad : राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड हे आज तुळजा भवानीचे दर्शन घेण्यासाठी आले होते. (Jitendra Awhad Meet Padmasinh Patil) दरम्यान, राष्ट्रवादीचे माजी ज्येष्ठनेते मंत्री, पद्मसिंह पाटील हे उस्मानाबादेत असल्याचे समजताच आव्हाड यांनी थेट उस्मानाबाद गाठत त्यांची भेट घेतली. या भेटीचा उल्लेख आव्हाड यांनी गुरु-शिष्याची ग्रेट भेट असा केला आहे.
या भेटीबद्दल आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले, आज तुळजाभवानीच दर्शन घेतल आणि तिथून थेट डॉ.पद्मसिंह पाटील (Ncp) साहेब उस्मानाबादेत आहे, हे समजलं आणि त्यांना भेटण्याच्या ओढीने त्यांच्या घराकडे निघालो. त्यांना भेटायला जात असताना अनेक क्षण माझ्यासमोर तरळत होते. यातील काही क्षण भावनिक होते तर काही खूप काही शिकवणारे. परंतु याच सगळ्या अनुभवांनी डॉक्टर साहेबांनी माझ्यातला कार्यकर्ता घडवला.
माझ्या कारकिर्दीच्या सुरवातीस मी कोण आहे, कुठला आहे, कोणत्या जातीचा आहे हे न बघता..फक्त मोठ्या विश्वासाने आणि मायेने त्यांनी माझ्या पाठीवर हात ठेवला होता. त्या हातांनी मला माझ्या राजकीय कारकीर्दीत मोठा आत्मविश्वास दिला. (Osmanabad) कोणत्याही परिस्थितीत ठामपणे उभे राहण्याची शिकवण दिली. १९९० सालच्या काँग्रेसमधील बंडाचा आणि त्यात डॉक्टर साहेबांनी घेतलेल्या भूमिकेचा मी साक्षीदार आहे.
त्यांनी ज्या पद्धतीने त्यावेळी किल्ला लढवला होता, ते प्रसंग आठवले तरी अंगावर काटे उभे राहतात. तीच गोष्ट १९९३ साली पवारसाहेब मुख्यमंत्री होत असताना देखील पुढे मी आणि माझ्यासकट अनेकांनी अनुभवली होती. आज ते कुठे आहेत, कोणत्या पक्षात आहेत या गोष्टीशी मला काही घेणेदेणे नाही. त्यांनी मला माझ्या उभरत्या काळात जी साथ दिली, माझ्या पाठीवर जो प्रेमाचा आणि मायेचा हात ठेवला, मला पवार साहेबांच्याकडे ते घेवून गेले या सर्वांचा उतराई होन कठीण आहे.
त्यांच्या या ऋणातून मुक्त व्हायची माझी देखील इच्छा नाही. त्यांच्याइतके दिलदार, निस्वार्थी माणसे हे आजच्या काळात अत्यंत दुर्मिळ झाले आहेत. त्याच्यासोबत जगलेले ते अनमोल क्षण परत येणार नाहीत, ही जाणीव त्रासदायक आहे. डॉ.साहेबांनी मला घडवल, माझ्यातला कार्यकर्ता घडवला ! आज त्यांना भेटलो, वाईट वाटल, कारण मी पाहिलेले,अनुभवलेले डॉक्टर साहेब आता थकलेत. त्यांनी कधीच थकू नये अस मनापासून वाटत असल तरी ते आपल्या हातात नाही. त्यांच्यासोबतचा हा फोटो मी आवर्जून काढून घेतला, माझ्यासाठी हा अनमोल ठेवा आहे, अशा शब्दात आव्हाड यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.