Aimim Politics : नाराजांच्या राड्यानंतरही ओवैसीही जलील यांच्या पाठिशी : हल्ला MIM ला महापालिकेत 'बुस्ट' मिळवून देणार की 'बुमरँग' होणार?

Imtiaz Jaleel attack controversy : एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्यावर झालेल्या जीवघेणा हल्ल्यानंतर आता एकच खळबळ उडाली आहे.
Aimim Politics; Imtiaz Jaleel and Asaduddin Owaisi
Aimim Politics; Imtiaz Jaleel and Asaduddin Owaisisarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्यावर शहरात जीवघेणा हल्ला झाला.

  2. विरोधकांनी हा हल्ला स्टंट असल्याचा आरोप केला असताना जलील यांनी हल्लेखोर एमआयएमचे नसल्याचा दावा केला.

  3. हल्ल्यानंतर असदुद्दीन ओवेसी यांनी जलील यांची भेट घेऊन पूर्ण पाठिंबा जाहीर केला.

Chhatrapati Sambhajinagar News : एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्यावर शहरात जीवघेणा हल्ला झाला. या घटनेने एकच खळबळ उडाली असताना विरोधकांनी मात्र हा एमआयएमचाच स्टंट असल्याचा आरोप केला आहे. तर इम्तियाज जलील यांनी हल्लेखोर हे एमआयएमचे कार्यकर्ते नव्हते, तर गुंड प्रवृत्तीच्या माजी नगरसेवक कलीम कुरेशी याचे समर्थक होते, असा दावा केला आहे. एमआयएममधील या राड्याने छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट आला आहे.

महापालिका निवडणुकीत उमेदवारांची यादी जाहीर करण्यात एमआयएमने आघाडी घेतली होती. इम्तियाज जलील यांनी आपल्या फेसबुक पेजवरून पहिली यादी जाहीर केली आणि वादाची ठिणगी पडली. उमेदवारी जाहीर झालेल्या असरार खान या उमेदवाराने आपल्या प्रभागातून रॅली काढली आणि याच वेळी उमेदवारी कापल्यामुळे संतापलेल्या इच्छुकांच्या समर्थकांनी असरार यांच्या गळ्यातील हार खेचून त्यांना मारहाण केली. तिकीट वाटपावरून इम्तियाज जलील यांच्यावर पाच ते पंधरा लाख रुपये घेतल्याचा आरोपही झाला.

इम्तियाज जलील यांनी लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभवाचे खापर आपल्याच पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांवर फोडल्याचा आरोप केला गेला. पक्षाच्या विरोधात काम केल्यामुळे इम्तियाज जलील यांनी गेल्या वेळच्या बावीस माजी नगरसेवकांची उमेदवारी कापली. ऐन निवडणुकीच्या काळात शहराची कार्यकारिणी बरखास्त केली. यातून पक्षामध्ये अतंर्गत खदखद मोठ्या प्रमाणात होती. इम्तियाज जलील यांनी टप्प्या टप्प्याने उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या, तसा असंतोष वाढत होता.

Aimim Politics; Imtiaz Jaleel and Asaduddin Owaisi
AIMIM Politics: चर्चेत राहण्यासाठी गोळीबाराचा स्टंट आला अंगलट, मालेगावच्या ‘फिटर’ला कोठडीची हवा!

मांडीला मांडी लावून बसणारेच झाले विरोधक...

इम्तियाज जलील यांच्यामुळेच विधानसभेची दोनवेळा उमेदवारी मिळालेले नासेर सिद्दीकी या पक्षाच्या माजी गट नेत्यानेच महापालिका निवडणुकीत उमेदवारी कापलेल्यांच्या नाराजीला हवा दिल्याचे बोलले जाते. इम्तियाज जलील आणि त्यांच्या मुलाने बसून उमेदवार ठरवले आणि त्याला ओवेसी यांची मंजुरी असल्याचे भासवून मनमानी केल्याचा सिद्दीकी यांचा आरोप आहे. आता हेच सिद्दीकी इम्तियाज यांच्याविरोधात मैदानात उतरले आहेत.

कलीम कुरेशी कोण?

इम्तियाज जलील यांच्या गाडीवर जिन्सी-बायजीपुरा भागात आज जो जीवघेणा हल्ला झाला, त्यामागे माजी नगरसेवक कलीम कुरेशी व त्यांच्या समर्थकांचा हात असल्याचा आरोप इम्तियाज यांनी केला आहे. गुटखा, रेशनचा तांदूळ काळ्या बाजारात आणि परराज्यात पाठवणारा कलीम कुरेशी हा गुंड असून त्याचा एमआयएम पक्षाशी कोणाताही संबंध नाही. हे गुंड भाजपचे मंत्री अतुल सावे, शिवसेनेचे संजय शिरसाट यांच्याकडून पैसे घेऊन आमच्यावर हल्ले करत आहेत, असा आरोप इम्तियाज यांनी केला होता.

इम्तियाज जलील आणि त्यांच्या एमआयएम पक्षाच्याविरोधात वातावरण आहे. लोक त्यांच्यावर प्रचंड नाराज आहेत, आपला पराभव निवडणुकीत होणार याची जाणीव झाल्यामुळे इम्तियाज जलील व त्यांच्या पक्षाच्या लोकांनी स्वतःच हा हल्ला घडवून आणल्याचा आरोपा कलीम कुरेशी व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. कलीम कुरेशी हे काँग्रेस आणि वंचित आघाडीकडून निवडणूक लढवत आहेत.

ओवेसी पाठीशी...

इम्तियाज जलील यांच्याविरोधात तिकीट वाटपाच्या नाराजीतून मोठा जनक्षोम असल्याचे चित्र निर्माण केले जात आहे. परंतु पक्षाचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी मात्र इम्तियाज यांच्या पाठीशी भक्कमपणे उभ्या असल्याचे दिसून येते. इम्तियाज जलील हे सुशिक्षित आहेत, लोकांच्या सेवेसाठी काम करत असताना त्यांना त्रास दिला जातोय, असे म्हणत त्यांनी इम्तियाज यांच्या निर्णयाशी आपण ठामपणे उभे असल्याचे स्पष्ट केले. एकूणच इम्तियाज जलील यांच्यावर झालेल्या आजच्या हल्ल्याचे पडसाद यापुढेही उमटू शकतात. आता हा हल्ला एमआयएम पक्षाला बुस्ट देणार की मग? खरचं त्यांच्या निर्णयाविरोधातील नाराजी हेच कारण या हल्ल्यामागे आहे हे 16 जानेवारी रोजीच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

Aimim Politics; Imtiaz Jaleel and Asaduddin Owaisi
AIMIM Political News : मध्य प्रदेशात एमआयएम निवडणूक लढवणार; काँग्रेसचा खेळ बिघडवणार

FAQs :

1. इम्तियाज जलील यांच्यावर काय हल्ला झाला?
→ शहरात त्यांच्या ताफ्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची माहिती आहे.

2. विरोधकांनी या घटनेबाबत काय आरोप केला?
→ हा हल्ला एमआयएमचाच स्टंट असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

3. इम्तियाज जलील यांनी हल्लेखोरांबाबत काय सांगितले?
→ हल्लेखोर हे माजी नगरसेवक कलीम कुरेशी याचे समर्थक असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

4. असदुद्दीन ओवेसी यांनी काय भूमिका घेतली?
→ त्यांनी इम्तियाज जलील यांची भेट घेऊन त्यांच्या मागे असल्याचे स्पष्ट केले.

5. या घटनेचा महापालिका निवडणुकीवर काय परिणाम होऊ शकतो?
→ प्रचारात तणाव वाढून राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com