Aimim News : 'पाणी अन् दारू' एमआयएमचा महापालिकेसाठी अजेंडा ठरला!

AIMIM leader Imtiaz Jaleel announces his party’s readiness for upcoming municipal elections : गेल्या महापालिकेत विरोधी पक्ष असलेल्या एमआयएमने नागरी प्रश्नांना हात घालत तयारी सुरू केली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरवासियांना पाण्याचा प्रश्न गेल्या वीस वर्षापासून भेडसावतो आहे.
AIMIM On Municipal Corporation Election News
AIMIM On Municipal Corporation Election NewsSarkarnama
Published on
Updated on

Municipal Corporation News : लोकसभा, विधानसभा निवडणुकीत अपयश आले असले तरी आगामी महापालिका निवडणुकीसाठी एमआयएमने दंड थोपटले आहेत. पक्षाच्या वतीने महापालिका निवडणुकीत कोणत्या मुद्द्यावर पक्ष लोकांसमोर जाणार आहे, याचा अजेंडा दर्शवणारे बॅनर शहरात लावण्यात आले आहेत. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी 'पाणी आणि दारू' हे दोन मुद्दे घेऊन लोकांपुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोना, ओबीसी आरक्षणासाठीच्या सर्वोच्च न्यायालयातील याचिकेमुळे महापालिकेसह (Municipal Corporation) राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुका रखडल्या होत्या. पाच वर्ष छत्रपती संभाजीनगर महापालिकेतही प्रशासक राज होता. नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका चार महिन्यात घेण्याचे निर्देश दिले आहेत. महापालिकेला निवडणूक आयोगानेही तयारीचा आढावा घेण्यासाठी पत्र पाठवले होते.

या सगळ्या पार्श्वभूमीवर गेल्या महापालिकेत विरोधी पक्ष असलेल्या एमआयएमने (AIMIM) नागरी प्रश्नांना हात घालत तयारी सुरू केली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरवासियांना पाण्याचा प्रश्न गेल्या वीस वर्षापासून भेडसावतो आहे. पाण्यासाठी अनेक योजना आल्या, काही सुरू आहेत, परंतु अद्याप एकही पूर्ण न झाल्याने नागरिकांना दहा-बारा दिवसानंतर पाणी मिळते आहे. या शिवाय शहरात गुन्हेगारी, नशेखोरी आणि दारूचे व्यसन जडलेल्यांची संख्या आणि त्यातून गुन्हेगारी कारवाया मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.

AIMIM On Municipal Corporation Election News
Imtiaz Jaleel-Devendra Fadnavis News : मुख्यमंत्री महोदय, तुमच्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमांमध्ये अल्पसंख्यांक मंत्रालय कुठे आहे?

एमआयएमने हेच दोन मुद्दे घेऊन आगामी महापालिका निवडणुकीत समोर जाण्याचा निर्णय घेतला. जर एआयएमआयएम महापालिकेत सत्तेत आले? तर आमचे प्राधान्य कोणत्या प्रश्नाला असेल हे लोकांना समजावे आणि चर्चा करावी यासाठी आम्ही शहरात होर्डिंग्ज लावले आहेत. आमचा अजेंडा अतिशय स्पष्ट आहे, की हे शहर सर्व प्रकारच्या उपद्रवांपासून मुक्त करून ते सुंदर बनवावे, असे पक्षाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

AIMIM On Municipal Corporation Election News
Municipal Corporation News : राज्य निवडणूक आयोगाचे महापालिकेला पत्र आले!

एमआयएमच्या निवडणूक अजेंड्या नूसार शहरातील सर्व देशी दारूची दुकाने बंद करावीत किंवा ती शहराच्या हद्दीबाहेर हलवावीत, ही प्रमुख मागणी असणार आहे. आमची सत्ता आली तर आम्ही हे वचन पूर्ण करु, असा विश्वास पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे. याशिवाय शहरातील नागरिकांना महिन्याच आठ ते दहा दिवसच नळाद्वारे पाणीपुरवठा केला जातो.

AIMIM On Municipal Corporation Election News
Chhatrapati Sambhajinagar Water Issue : संभाजीनगरच्या पाणी योजनेची कासवगती, सावे-इम्तियाज यांचा प्राधिकरणाचा आग्रह नडला!

नळपट्टी मात्र पूर्ण महिन्याची, वर्षाची आकारली जाते. नागरिकांवर होणार हा अन्याय दूर करण्यासाठी ज्या दिवशी नळाला पाणी येईल, त्याच दिवशीची नळपट्टी आकारली जावी, यासाठी पक्ष आग्रही राहणार आहे. हे वचन देखील महापालिकेत पक्षाची सत्ता आली तर आम्ही पूर्ण करू, अशी ग्वाही बॅनरबाजीच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com