Beed Politics : उपमुख्यमंत्री अजित पवारांची खासदार बजरंग सोनवणेंना लिफ्ट; हेलिकॉप्टरमधून एकत्र प्रवासाने नवा ट्विस्ट, बीडचे राजकारण बदलणार?

Ajit Pawar Bajrang Sonawane : अजित पवार हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी या दौऱ्यात खासदार बजरंग सोनवणेंनी हेलिकॉप्टरमधून पवारांसोबत एकत्र पवार केला.
bajrang sonwane ajit pawar
bajrang sonwane ajit pawarsarkarnama
Published on
Updated on

Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या नेतृत्वात नगरपंचायत निवडणूक लढण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने धारुर व माजलगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाकी नऊ आणले. तर, माजलगावमध्ये त्यांनी सत्ताही मिळवली. गुरुवारी अजित पवार हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी या दौऱ्यात खासदार बजरंग सोनवणेंनी पवारांच्याच हेलिकॉप्टरमधून लिफ्ट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्चा सुरू झाल्या आहेत.

अजित पवारांनी पंडितांच्या शिवछत्र निवासस्थानी नाष्टा केला. नाष्ट्याच्या टेबलवर पवारांसोबत आमदार सोळंके, माजी आमदार अमरसिंह पंडित, अंबा कारखान्याचे अध्यक्ष रमेश आडसकर, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी आदी नेत्यांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सहाल चाऊस व मोहन जगताप हे देखील होते. यांच्या नेतृत्वाखालील उमेदवाराने आमदार प्रकाश सोळंके यांचे होमटाऊन माजलगावमध्ये त्यांच्या नेतृत्वाखालील नगराध्यक्षाच्या उमेदवाराचा पराभव केला होता.

हसत, एकमेकांची चेष्टामस्करी करत सोळंके, चाऊस, जगताप यांनी नाष्टा घेतला. त्यानंतर पवार हेलिकॉप्टरने परतीच्या प्रवासाला निघाल्यानंतर सोबत खासदार बजरंग सोनवणेही होते. त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून सुरुवातीच्या पवारांच्या विकास कामांच्या कार्यक्रमाला सोनवणेंची हजेरी लोकप्रतिनिधी म्हणून सहाजिकच होती. पण, हेलिकॉप्टर लिफ्टने चर्चांना वाव मिळाला आहे.

bajrang sonwane ajit pawar
Pooja More controversy : 'हा फक्त ट्रेलर, मनोज जरांगे आणि तुमचे...', पूजा मोरेंनी उमेदवारी मागे घेताच लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल

आमचं चागंल चाललंय...

अजित पवार यांच्या कार्यक्रमाला मंत्री पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, आमदार नमिता मुंदडा, धनंजय मुंडे अनुपस्थित होते. त्यावरून त्यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, अनुपस्थितीवरुन माध्यमांनी फुकट चर्चा करु नये. एक जानेवारीला लोक कुटूंबासोबत फिरायला जातात. मला धंनजय मुंडेंनी अगोदरच तसे सांगितलेले आहे. तसेच आमचं चांगल चाललंय अशी टिपण्णीही केली.

bajrang sonwane ajit pawar
Dynastic Politics : महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचा कहर; पतीला ठाकरेंची उमेदवारी, पत्नीला शिंदेंच्या शिवसेनेचे तिकीट!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com