DCM Ajit Pawar In Massajog : अजित पवारांचा 'वादा' कुणाचाही राजकीय हस्तक्षेप होणार नाही, मास्टरमाईंड शोधला जाईल!

Ajit Pawar meets Deshmukh family : मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत, सखोल चौकशी होईल, यात कुठलाही हलगर्जीपणा किंवा त्रुटी राहणार नाही याची काळजी सरकार घेईल. सरकारच्या वतीने मी संतोष देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

बीड : संतोष देशमुख यांची हत्या झाली याचे दुःख सगळ्यानाच आहे. या घटनेमागे जे कोणी आहेत, मास्टरमाईंड वगैरे तो शोधला जाईल. कुणाचाही राजकीय हस्तक्षेप या तपासात होणार नाही, असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना आणि मस्साजोगच्या नागरिकांना दिला. अजित पवारांनी आज मस्साजोग येथे भेट देऊन सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. कोणत्याही परिस्थिती आरोपींवर कारवाई केली जाईल, असेही अजित पवार यांनी या भेटीत सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज परभणी आणि बीड (Beed News) जिल्ह्यातील मस्साजोगला भेट देत पिडित कुटुंबाची भेट घेतली. त्यानंतर सायंकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार मस्साजोगमध्ये दाखल झाले. संतोष देशमुख यांच्या निर्घृण खून प्रकरणाने राज्यातील वातावरण तापले आहे. या खून प्रकरणात राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या विश्वासू सहकारी वाल्मिक कराड याचे नाव समोर येत आहे.

Ajit Pawar
Sharad Pawar Visit Massajog : दहशतीतून बाहेर पडा, सगळे मिळून परिस्थितीला तोंड देऊ..

मुंडे यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी करा, त्यांना कुठलेही खाते देऊ नका, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी मस्साजोग येथे भेट देत संतोष देशमुख यांच्या मारेकरी आणि त्यामागच्या मास्टरमाईंडचा शोध घेतला जाईल, असे ठामपणे सांगितले. कुणीही मास्टरमाईंड असेल त्याला सोडणार नाही, दोषींना कठोर शिक्षा होणार आहे. कुणीही मास्टरमाईंड असला तरी त्याची गय केली जाणार नाही.

Ajit Pawar
Ajit Pawar: 'गिरीश आता तरी सुधार..'; असे सभागृहात अजित पवार का म्हणाले ?

या घटनेमुळे बीड जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होईल, अशी चर्चा आहे. पण मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत, सखोल चौकशी होईल, यात कुठलाही हलगर्जीपणा किंवा त्रुटी राहणार नाही याची काळजी सरकार घेईल. सरकारच्या वतीने मी संतोष देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या प्रकरणाचा संपूर्ण तपास पूर्ण होईपर्यंत कुणालाही सोडले जाणार नाही, याचा पुनरुच्चार अजित पवार यांनी केला.

Ajit Pawar
Santosh Deshmukh Murder Case : CM फडणवीसांनी आरोपींना शिक्षा करण्याची घोषणा करताच, संतोष देशमुखांच्या मुलीने केली 'ही' मोठी मागणी

दरम्यान, धनंजय मुंडे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात. परंतु परळीतील खंडणी आणि सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून खून प्रकरणात धनंजय मुंडे यांचा राईट हॅन्ड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाल्मक कराडकडे संशयाची सुई फिरते आहे. खंडणी प्रकरणात कराडवर गुन्हा देखील दाखल झाला आहे. अशावेळी धनंजय मुंडे यांचे मंत्रीमंडळातील स्थान धोक्यात येते की काय? अशी चर्चाही राजकीय वर्तुळात होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com