Ajit Pawar: 'गिरीश आता तरी सुधार..'; असे सभागृहात अजित पवार का म्हणाले ?

Nagpur Winter Session : विधानपरिषदेच्या सभापतिपदी राम शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषण करताना जोरदार टोलेबाजी केली.
Girish Mahajan | Ajit Pawar
Girish Mahajan | Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : नागपुरात विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा गुरुवारी चौथा दिवस आहे. महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर खातेवाटप कधी होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. विधानपरिषदेच्या सभापतिपदी राम शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषण करताना जोरदार टोलेबाजी केली. यावेळी भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांना 'गिरीश आता तरी सुधार, आता तरी सुधार, कट होता होता वाचलास तू,' असे म्हणत अजितदादांनी चिमटे काढताच सभागृहात एकच हशा पिकला.

विधानपरिषदेमध्ये गुरुवारी सभापतीपदाचा प्रस्ताव सादर करण्यात आला. माजी मंत्री राम शिंदे (Ram Shinde) यांची विधानपरिषद सभापतीपदी एकमताने निवड करण्यात आली. शिंदे यांची महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती म्हणून निवड करण्यात यावी यासंबंधीचा प्रस्ताव आमदार श्रीकांत भारतीय यांनी विधान परिषद सभागृहात मांडला. या प्रस्तावाला विधान परिषदेच्या सदस्य मनीषा कायंदे तसेच अमोल मिटकरी, शिवाजी गर्जे, ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी अनुमोदन दिले. यानंतर आवाजी मतदानातून राम शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली.

Girish Mahajan | Ajit Pawar
Chhagan Bhujbal : 'तिकडे' काय चालले आहे, हे छगन भुजबळांना अडीच वर्षांनंतर कळाले!

शिंदे यांची निवड झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भाषणे झाली. यावेळी अजित म्हणाले की, या विधानसभेचे वैशिष्ट्य पाहिले तर अनेक तरुण आमदार निवडून आले आहेत. विधानसभेचे अध्यक्ष देखील तरुण आहेत तर परिषदेत देखील तरुण सभापती बसवले असल्याचे त्यांनी सांगितले.

Girish Mahajan | Ajit Pawar
Chhagan Bhujbal : सरकारमधील विसंवाद भुजबळांनी केला उघड; तोडीस तोड उत्तर देणार

कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे रोहित पवार विरुद्ध भाजपचे (Bjp) राम शिंदे यांच्यात लढत झाली. या निवडणुकीत रोहित पवारांनी 1100 मतांनी विजय मिळवला. यानंतर राम शिंदे यांनी अजित पवारांनी कर्जत-जामखेडमध्ये सभा घेतली नाही, असा हल्लाबोल केला होता. यावरूनदेखील अजित पवारांनी वक्तव्य केले.

Girish Mahajan | Ajit Pawar
NCP Politics : "OBC च्या नावावर दुकानदारी बंद करा...", छगन भुजबळांविरोधात अजितदादांचे नेते आक्रमक

राम शिंदे सर तुम्ही बोलताना म्हणाला होतात अजित पवारांनी माझ्या येथे सभा घेतली नाही. त्यामुळे आपला पराभव झाला, असे आपण बोलले होतात. मात्र जे झाले ते चांगले झाले अन आपण सभापती झालात. तुम्ही जर निवडून आला असता आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मनात तुम्हाला कॅबिनेट मंत्रिपद द्यावे, असे वाटले असते तर गिरीश महाजनांचे मंत्रिपद गेले असते. गिरीश आता तरी सुधार, आता तरी सुधार, कट होता होता वाचलास तू, असे म्हणत अजित पवार यांनी तुफान फटकेबाजी केली. अजित दादांनी सभागृहात केलेल्या या जोरदार टोलेबाजीमुळे सभागृहात एकच हशा पिकला.

Girish Mahajan | Ajit Pawar
Congress vs BJP : शहांच्या ‘त्या’ विधानाने बिघडवला खेळ; विरोधक आक्रमक, मोदी का उतरले मैदानात?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com