Parbhani Municipal Elections latest news: पंचवीस वर्षात मी पिंपरी-चिचवड भागाचा विकास करून दाखवला आहे. परभणीतही मी लक्ष घालतो आहे. आम्ही जिथे जिथे लक्ष घालतो, तिथे जे ठरवले ते करतोच. महापालिका निवडणुकीत आम्ही जुन्या अनुभवी आणि नव्या चेहऱ्यांना संधी देत समन्वय साधला आहे. आपलं भलं कशात आहे? हे ओळखा. नाती-गोती, जातीपातीचा विचार करू नका, असे आवाहन करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परभणीकरांना विकासाचा वादा केला.
महापालिका निवडणुकीच्या प्रचारानिमित्त परभणीत अजित पवार (Ajit Pawar) यांची शुक्रवारी सभा झाली. नुकत्याच झालेल्या नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत अजित पवारांनी बारामती पॅटर्न आणि पिंपरी-चिंचवडमधील विकासाचा दावा करत मतदारांना आवाहन केले होते. मराठवाड्यात त्यांच्या या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे त्यांच्या पक्षाला मिळालेल्या यशावरून दिसून आले आहे. आता महापालिका निवडणुकीसाठीही अजित पवारांनी तोच पॅटर्न पुन्हा आणला आहे.
परभणी शहरात धुळीचे साम्राज्य आहे, दुभाजकांमधील झाडे वाळली आहेत, रस्ते खराब असल्याचे सांगतानाच वळण रस्ते, उत्पन्नवाढीसाठी परभणी शहर दत्तक घेण्याची आपली तयारी असल्याचे अजित पवार म्हणाले. परभणी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेले सर्व प्रश्न मार्गी लावण्याचा शब्द देतानाच यासाठी आपण वैयक्तिक लक्ष देऊ, अशी ग्वाही अजित पवार यांनी आपल्या भाषणात दिली.
परभणीत वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीबरोबरच मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, कॅन्सर हॉस्पिटलची उभारणी करण्यात येईल. शिक्षण क्षेत्रात सीबीएसई अभ्यासक्रमाच्या शाळा, मराठी माध्यमांच्या शाळांचे पुनरुज्जीवन तसेच एआय तंत्रज्ञानावर आधारित अभ्यासक्रम राबविण्यावर भर दिला जाईल.
फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारधारेवर आधारित राष्ट्रवादी काँग्रेसची वाटचाल सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) केलेल्या विकासकामांचा अनुभव परभणीकरांनी घ्यावा आणि त्याच धर्तीवर परभणीत काय करता येईल, याचा विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.