Prakash Solanke : अजितदादांचा उमेदवार झाला प्रचंड भावनिक; म्हणाला, '...तर मला भरचौकात फाशी द्या'

Majalgaon Assembly Constituency: माजलगाव मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके निवडणूक लढवत आहेत. सोळंके यांनी यंदाच्या निवडणूक प्रचाराच्या मुद्द्यांमध्ये त्यांनी आरक्षण चळवळीच्या लढ्यावेळी आपलं घर जाळण्यात आल्याची आठवण सांगितली.
MLA Prakash Solanke
MLA Prakash SolankeSarkarnama
Published on
Updated on

Beed News : विधानसभा निवडणुकीसाठी शेवटचा आठ दिवसाचा कालावधी शिल्लक राहिला असताना प्रचार आता शिगेला पोहचला आहे. सर्वच पक्षाने जोराची तयारी केली आहे. या निवडणुकीसाठी महायुती व महाविकास आघाडीने मोठी ताकद लावली आहे. या निवडणुकीत मनसे, एमआयएम, वंचित आघाडी व इतर छोटे-मोठे पक्ष मैदानात उतरले आहेत. त्यामुळे चुरस वाढली आहे.

माजलगाव मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार प्रकाश सोळंके निवडणूक लढवत आहेत. सोळंके यांनी यंदाच्या निवडणूक प्रचाराच्या मुद्द्यांमध्ये त्यांनी आरक्षण चळवळीच्या लढ्यावेळी आपलं घर जाळण्यात आल्याची आठवण सांगितली. तसेच, मी कोणाच्याही नावाने तक्रार केली नसल्याचे स्पष्ट करीत करीत तक्रार केली असेल तर मला भर चौकात फाशी द्या, असे वक्तव्य केले.

MLA Prakash Solanke
Raj Thackeray : राज ठाकरे 'या' पक्षासोबत कंम्फर्टेबल, स्वतःच सांगितलं कारण

बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात चुरशीच्या लढती पहावयास मिळत आहेत. त्यामध्ये परळी आणि माजलगाव मतदारसंघाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. मराठा आरक्षण आणि उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांचा शब्द जिल्ह्यात मानला जातो. त्यामुळे येथील मतदारसंघात कोणता उमेदवार निवडून येणार, कोणता उमेदवार पडणार याची चर्चा जिल्ह्यात सुरु आहे.

MLA Prakash Solanke
Rohit Pawar: पहाटेच्या शपथविधी, अदानींना विचारा काय घडलं? निवडणूक जिंकण्यासाठी अजितदादांचा हा केविलवाणा प्रयत्न!

परळी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे मैदानात आहेत. तर, माजलगाव मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके (Prakash Solnke) हे स्वत: निवडणूक लढवत आहेत. या दोन्ही लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. मी असं काय पाप केलं होतं. माझं आणि माझ्या भावाचे घर जाळण्यात आले.

आंदोलन करण्याची ही पद्धत होती काय? घर सोडून आम्हाला पळून जावे लागले. दोन-दोन, अडीच वर्षाच्या नातवांना अक्षरशः बंगल्यावरून खाली झेलावे लागले. आंदोलन करण्याची ही कसली पद्धत आहे, असा सवालही यावेळी आमदार सोळंके यांनी उपस्थित केला.

या घटनेनंतर मी कोणत्याही आंदोलनकर्त्यांच्या नावाची तक्रार दिली नाही. मी कोणालाही अटक करण्यास लावले नाही. त्यानंतर तक्रार केली म्हणून मला बदनाम करण्यात आले. जर, मी तक्रार केली असेल तर मला भर चौकात फाशी द्या, असे भावनिक वक्तव्य महायुतीचे माजलगाव मतदारसंघाचे उमेदवार प्रकाश सोळंके यांनी केले.

MLA Prakash Solanke
Maharashtra Assembly Election: धाकधूक वाढली; महायुती की महाविकास आघाडी राजकीय विश्लेषक म्हणतात...

माजलगावमध्ये तिरंगी लढत

माजलगावचे विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांनी राजकीय संन्यास घेत असल्याची घोषणा केली होती. मात्र, अजित पवारांकडून त्यांनाच उमेदवारीचा आग्रह करण्यात आला. त्यामुळे, महायुतीकडून आमदार प्रकाश सोळंके यांचे नाव जाहीर करण्यात आले. येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून मोहन जगताप निवडणूक लढवत आहेत. तर, गतवेळेसचे विरोधक असलेले रमेश आडसकर हे अपक्ष मैदानात उतरले आहेत. त्यामुळे या तिरंगी लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

MLA Prakash Solanke
Savner Assembly Constituency : अमोल देशमुखांनी दाखल केली केदारांसह सख्या भावावर ‘चार्जशिट'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com