NCP News : मंत्रिपदावरून अजितदादांच्या शिलेदाराने व्यक्त केली खंत; म्हणाले, 'पाठीमागून आलेले कधी पुढे गेले समजलेच नाही'

Ajit Pawar News : पहिल्यांदाच आमदार झालेले ज्युनियर मंडळी पाठीमागून कधी पुढे गेली ते समजलंही नाही, अशी खंत विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघातील तीन टर्म आमदार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काळे यांनी व्यक्त केली.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Dharashiv News : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन दीड महिन्याचा कालावधी लोटला तरी मंत्रिमंडळातील नाराजी नाट्य संपण्यास तयार नाही. मंत्रिपदावरून अद्याप महायुतीमधील तीनही घटक पक्षांत नाराजी असल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यातच अजितदादांच्या शिलेदाराने भर कार्यक्रमातच मंत्रिपदाबाबत खदखद व्यक्त केली. पहिल्यांदाच आमदार झालेले ज्युनियर मंडळी पाठीमागून कधी पुढे गेली ते समजलंही नाही, अशी खंत विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघातील तीन टर्म आमदार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काळे यांनी व्यक्त केली.

धाराशिव येथील एका कार्यक्रमावेळी त्यांनी ही खदखद व्यक्त केली. प्रत्येक आमदारांना मंत्रिपदाची इच्छा असते. त्याप्रमाणे विक्रम काळे यांनीदेखील मंत्रिपदाची इच्छा व्यक्त केली. आपल्याला मंत्रिपद लवकर मिळणार नाही, असेही त्यांनी अप्रत्यक्षपणे आपल्या भाषणात नमूद केले. आमदार बाबासाहेब पाटील (Babasaheb Patil) हे आपल्यापेक्षा वयाने ज्येष्ठ आहेत. त्यामुळे त्यांना आधी मंत्रिपद मिळेल, मग आपला नंबर लागेल, असे काळे यांनी स्पष्ट केले.

Ajit Pawar
BJP and Union Budget 2025 : भाजपचा 'निशाणा' मध्यमवर्ग अन् 'निगाहें' दिल्ली विधानसभा निवडणुकीवर!

यावेळी मार्गदर्शन करताना विक्रम काळे (Vikram Kale) म्हणाले, 'आमदार संजय बनसोडे हे माझ्या मागून आले अन मंत्री झाले. पण मी अजूनही आमदारच आहे, अशी खंत काळे यांनी भर कार्यक्रमात व्यक्त केली. विक्रम काळे यांच्या वक्तव्यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार आणि संजय बनसोडे काय प्रतिक्रिया देतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Ajit Pawar
Mahayuti News : 'स्थानिक'च्या निवडणुकीवरून धुसफूस; अशोक चव्हाणांच्या स्वबळाच्या नाऱ्यानंतर महायुतीत रणकंदन

दरम्यान, बाबासाहेब पाटील आणि मी सिनियर होतो. आम्हाला सोडून संजय बनसोडे कधी आमच्या दोघांच्या मधून गेले आणि मंत्री झाले ते कळाले नाही. आम्हाला आनंद झाला की, आमच्या भागातील एक तरुण कार्यकर्ता आमदार म्हणून विधानसभेत गेले आणि त्यांना मंत्रिमंडळात संधी मिळाली. आम्ही दोघांनीदेखील त्यांचं स्वागत केले, असे विक्रम काळे म्हणाले.

Ajit Pawar
Shinde group criticism: : 'उद्धव ठाकरेंना आमदारांनी सोडून जाऊ नये म्हणून खेळी..' शिंदेंच्या शिलेदाराने फटकारले

बाबासाहेब पाटील तुम्हाला अध्यक्षांनी नागपूरला या म्हणून फोन केलेला ना? पाटील साहेब खरे सांगा, कारण पक्षप्रमुख अजित पवार यांच्याशी माझी चर्चा झाले. ते म्हणाले की, ज्येष्ठांना प्राधान्य. मी म्हटले, हरकत नाही. मला एकच कळते की, काम करत राहणं. ज्या खुर्चीवर तुम्हाला बसवले आहे, ती खुर्ची तुमच्या कामाला आली पाहिजे, असे विक्रम काळे यांनी स्पष्ट केले.

Ajit Pawar
Nana Patole : नाना पटोलेंनी कट्टर विरोधकाची घेतली गळाभेट; नेमक काय घडलं ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com