Ajit Pawar : "मकोका लावायलाही..."; बीडमधील घटनांवरून अजितदादा भडकले, धनंजय मुंडे शेजारी उभे असतानाच दिला इशारा

Ajit Pawar Beed Visit : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार गुरूवारी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. पालकमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर ते पहिल्यांदाच बीड दौऱ्यावर आले आहेत. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे सध्या बीडमधील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापलं आहे.
Ajit Pawar, Dhananjay Munde
Ajit Pawar, Dhananjay MundeSarkarnama
Published on
Updated on

Beed News, 30 Jan : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) गुरूवारी (ता.30) बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. पालकमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर ते पहिल्यांदाच बीड दौऱ्यावर आले आहेत. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे सध्या बीडमधील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापलं आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर अजित पवारांचा आजचा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. अजित पवार बीडमध्ये पोहोचताच त्यांच्या स्वागतासाठी मंत्री धनंजय मुंडे आवर्जून (Dhananjay Munde) हजर राहिले होते. यानंतर बीडमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात अजितदादांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना बीडमधील सध्याच्या परिस्थितीवर त्यांनी भाष्य केलं.

Ajit Pawar, Dhananjay Munde
Local self-government elections : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लांबणीवर; नेते, कार्यकर्त्यांचा जीव टांगणीला

महत्वाची बाब म्हणजे बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी थेट संबंध असलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या आरोपी वाल्मिक कराडचे आणि धनंजय मुंडेंचे जवळचे संबंध असल्यामुळे मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. या मागणीवर अजितदादांनी यापूर्वीच अजितदादांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

मात्र, आज धनंजय मुंडे शेजारी उभे असतानाच अजित पवारांनी मोठं वक्तव्य केलं आहे. तथ्य असेल तर कोणालाही सोडलं जाणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले, यंदा महायुतीला चांगलं बहुमत मिळालं आहे. आपल्या हातात पाच वर्ष आहेत. आपल्याला चांगल्याप्रकारे कामं करायची आहेत. मात्र, सध्या बीडबाबतच्या (Beed) वेगवेगळ्या प्रकराच्या बातम्या आपण वाचत असतो. यामध्ये जिथे तथ्य असेल तिथे संबंधितांवर कारवाई केली जाईल.

Ajit Pawar, Dhananjay Munde
Mahayuti Government : महसूलमंत्री बावनकुळेंचा धडाकेबाज निर्णय; जिल्हाधिकारी, तहसीलदार अन् प्रांताधिकारी कामाला लागणार

पण जिथे तथ्य नसेल त्या संदर्भामध्ये कारवाई करण्याचा प्रश्नच येत नाही. मी अनेक ठिकाणी पालकमंत्री म्हणून काम केलं आहे. बीडमध्ये कष्टकरी समाज मोठ्या प्रमाणात राहतो. मी काम करताना कधीही जातीपातीचा, नात्यागोत्याचा विचार करत नाही. त्यामुळे जातीय सलोखा आपण ठेवला पाहिजे.

युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून आपल्याला पुढं जायचं आहे, असं ते म्हणाले. तसंच यावेळी त्यांनी खंडणी मागणाऱ्यांवर मकोका लावणार असल्याचा इशारा देखील दिला. अजितदादा म्हणाले, "कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नका. पण मी पुन्हा सांगतो जर कोणी एखाद्या गोष्टीसाठी जबाबदार असेल, विकास कामे करताना कोणी कोणाला खंडणी मागितली असेल तर मी मकोका लावायला देखील मागे पुढे बघणार नाही."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com