Ajit Pawar News: विधानसभा निवडणूक महाराष्ट्रात होऊ घातली असल्याने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणसह विविध योजनांचा सपाटा राज्यातील महायुती सरकारने लावलेला आहे. त्यावर राज्य दिवाळखोरीत निघाल्याचा हल्लाबोल विरोधकांनी केला. मात्र, हा आरोप राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फेटाळला.
'विरोधक काहीही बोलतात. राज्य एकदम मजबूत असून आर्थिक परिस्थिती चांगली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीसह कुठलीही योजना बंद होणार नाही,असे अजित पवार पिंपरी-चिंचवडमध्ये विकासकामांच्या उद्घाटनावेळी म्हणाले.
1 हजार 700 कोटी रुपयांच्या 35 विविध विकासकामांची ई उदघाटने आणि भूमिपूजन अजित पवार यांच्या हस्ते झाले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजारी, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरला असल्याने ते येऊ शकले नाहीत, असे सांगत पवारांनी शिंदे-फडणवीस यांच्या गैरहजेरीवरून नंतर होणाऱ्या चर्चेला अगोदरच पूर्णविराम दिला.
उद्घटना कार्यक्रमाला खासदार श्रीरंग बारणे,आमदार आमदार अश्चिनी जगताप, आमदार महेश लांडगे, आमदार अण्णा बनसोडे आदी उपस्थित होते.पंतप्रधानांचे आभार
गेल्या कित्येक वर्षांची अनेक पंतप्रधानांकडून पूर्ण न झालेली मराठीला राजभाषेला दर्जा देण्याची मागणी नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केल्याबद्दल त्यांचे जाहीर अभिनंदन करत धन्यवादही अजित पवारांनी दिले. पिंपरी-चिंचवडवर आपले विशेष प्रेम असल्याचे सांगत येथील कार्यक्रमाला येण्यास उशीर झाल्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.